Home वरोरा एल्गार :- एकोना कोळसा खदान बंदच्या जनआंदोलनाला प्रचंड प्रतिसाद,

एल्गार :- एकोना कोळसा खदान बंदच्या जनआंदोलनाला प्रचंड प्रतिसाद,

आंदोलनकर्त्यांचा मुंडन करून वेकोलि प्रशासनाचा निषेध. न्याय न मिळाल्यास रविवार पासून आमरण उपोषण ?

वरोरा प्रतिनिधी :-

एकोना कोयला खदान संघर्ष समितीचे अध्यक्ष गणेश चवले यांच्या नेत्रुत्वात आज खदान बंद जन आंदोलन माढेळी वरोरा रस्त्यांच्या चरुरखटी फाट्यावर सकाळी १० वाजेपासून सुरू झाले होते व या आंदोलनात वरोरा तालुक्यातील शेकडो तरुण महिला व पुरुषांनी या सहभाग नोंदवला पण या आंदोलनाला कडक पोलीस बंदोबस्त असल्याने आंदोलनकर्त्याना कोळसा खाणीत जाण्यास मज्जाव करण्यात आला. दरम्यान वेकोलि चे उपक्षेत्रीय प्रबंधक यांनी आंदोलनाच्या मंडपाला भेट देऊन आंदोलनकर्त्याचे म्हणणे ऐकले व या संदर्भात आम्ही वेकोलि माजरी क्षेत्राचे मुख्य महाप्रबंधक व वेकोलि सीएमडी नागपूर यांना माहिती देऊ अशी ग्वाही दिली. परंतु त्यांच्या या आश्वासनाला आम्ही बळी पडणार नाही व आपल्याकडून सकारात्मक उत्तर आले नाही तर रविवार पासून आमरण उपोषण करू असा इशारा आंदोलनकर्त्यानी वेकोलि अधिकाऱ्यांना दिला.

वेकोलि प्रशासनाने जनसुनावणी घेऊन एकोना कोळसा खदान निर्मिती दरम्यान जे आश्वासन दिले ते आश्वासन वेकोलिने पाळले नाही व परिसरातील चार गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी घेतांना अनेक शेतकऱ्यांवर अन्याय केला अजूनही काही प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला नाही व येथील कोळसा खाणीत स्थानिक तरुण बेरोजगारांना डावलून बाहेर प्रांतातील व तालुक्याबाहेरील लोकांना कामावर घेतले. कोळसा खदान होऊन जवळपास पाच वर्ष झाली असताना एकोना गावाचे पुनर्वसन नाही तर बाकीच्या मार्डा. चरुरखटी व वनोजा या गावांत पायाभूत विकास करण्यात आला नाही. एवढेच नव्हे तर या परिसरात मोठ्या प्रमाणात जड वाहतूक होतं असल्याने रस्त्यांची दुर्दशा झाली, जागोजागी खड्डे पडून अपघाताचा धोका निर्माण झाला, या परिसरातील गावातील घरांना कोळसा खाणीतील ब्लास्टिंग मुळे तडे जातं असून रात्रीच्या वेळी ब्लास्टिंग मुळे भूकंपाचे झटके आल्याचा भास नागरिकांना होतं आहे. प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले व त्यामुळे आरोग्याच्या समस्या वाढल्याने या परिसरातील चार गावे संकटात सापडले आहे. या सर्व समस्यांना घेऊन या परिसरातील सर्व ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व सामाजिक कार्यकर्त्यांना एकत्रित करून एकोना कोळसा खदान संघर्ष समिती स्थापन केली आणि एकोना ग्रामपंचायत सरपंच गणेश चवले यांच्या नेत्रुत्वात वेकोलि प्रशासनाविरोधात आज जनआंदोलन करण्यात आले या आंदोलनाला मोठी गर्दी झाल्याने दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले होते.

कार्यकर्त्यांनी मुंडन करून वेकोलि प्रशासनाचा केला निषेध.

एकोना कोळसा खदान संघर्ष समितीने पुकारलेल्या या आंदोलनाची दखल वेकोलि प्रशासनाने घेतली नसल्याने आंदोलनकर्त्यानी मुंडन करून वेकोलि व्यवस्थापनाचा निषेध केला यावेळी या समितीचे अध्यक्ष सरपंच गणेश चवले यांच्यासह साहेबराव ठाकरे, उमेश माहुरे. आदित्य वनशिंगे, प्रमोद क्षीरसागर, खुशाल वनशिंगे. दिलीप लोहकरे. पवन फूलझेले. नंदू टेमुर्डे. शरद भोयर. दादा पिजदुरकर. लभान वैद्य. अजय डोंगरे. विलास पाटील. प्रफुल जोगी. सतीश गारसे. सुभाष ढवळे. उद्देभान बोथले. पांडू काळे व समीर पोहिनकर यांनी मुंडन केले. या अनोख्या आंदोलनाची दखल वेकोलि प्रशासनाने घेतली नसल्याने आंदोलक अधिक आक्रमक झाले आहे.

Previous articleआज एकोना कोळसा खदान(wcl) बंद करण्यासाठी स्थानिक भूमिपुत्रांचा होणार एल्गार.
Next articleएकोना (wcl) कोळसा खदान प्रशासनाविरोधात आंदोलनकर्त्यांची भूमिका काय ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here