Home वरोरा एकोना (wcl) कोळसा खदान प्रशासनाविरोधात आंदोलनकर्त्यांची भूमिका काय ?

एकोना (wcl) कोळसा खदान प्रशासनाविरोधात आंदोलनकर्त्यांची भूमिका काय ?

जिल्हाधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सरपंच संघटनेचे काय ठरले ?

वरोरा प्रतिनिधी :-

मागील तीन दिवसांपासून एकोना कोयला खदान संघर्ष समितीचे अध्यक्ष गणेश चवले यांच्या नेत्रुत्वात एकोना खदान व्यवस्थापनाच्या दडपशाही विरोधात खदान बंद जनआंदोलन माढेळी वरोरा रस्त्यांच्या चरुरखटी फाट्यावर सुरू आहे. या आंदोलनात वरोरा तालुक्यातील शेकडो तरुण महिला व पुरुषांनी सहभागी होऊन आपला आक्रोश नोंदवला परंतु या आंदोलनाला कडक पोलीस बंदोबस्त असल्याने आंदोलनकर्त्याना कोळसा खाण बंद करण्याची संधीच मिळाली नाही त्यामुळे शांततेच्या मार्गाने हे आंदोलन सुरू आहे.

या आंदोलनाला दिवसेंदिवस तरुण बेरोजगार महिला व पुरुषांचा सहभाग वाढत आहे त्यामुळे या आंदोलनाची नेमकी दिशा काय असणार व वेकोलि प्रशासन काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान काल शुक्रवारला सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन मागण्या संदर्भात चर्चा केली व आज शनिवार ला तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी तहसीलदार व वेकोलि चे अधिकारी यांच्यात बैठक होणार आहे. या बैठकीत काय निर्णय लागतो यावर समोरील आंदोलनाचे स्वरूप अवलंबून आहे.

वरोरा माढेळी रस्त्यांवर चरुरखटीच्या टप्प्यावर सुरू असलेले हे जनआंदोलन दिवसागणिक मोठे होऊन प्रशासनाची डोकेदुखी ठरणार आहे पण स्थानिक भूमिपुत्र तरुण बेरोजगार यांच्या हक्काचा व जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने आंदोलनाची ही निर्णायक लढाई मागण्या पूर्ण होतं पर्यंत संपणार नाही असं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे. कारण या वेकोलि एकोना कोळसा खदानित ज्या महालक्ष्मी व इतर कंपन्या आहे त्यांना येथील राजकीय लोकप्रतिनिधींचा छुपा पाठिंबा असल्याची बाब समोर येत आहे तर येथील प्रशासन त्यांच्या इशाऱ्यावर चालत असल्याने आंदोलनकर्त्याना स्थानिक प्रशासनाकडून न्याय मिळणे कठीण झाले आहे आणि म्हणूनच सरपंच संघटनेच्या प्रतिनिधीनीसह या परिसरातील शेकडो तरुणांनी मुंडन करून वेकोलि प्रशासनाचा निषेध नोंदवला आहे.

दरम्यान जिल्हाधिकारी यांच्याकडे सरपंच गणेश चवले यांच्या नेत्रुत्वात वेकोलि परिसरातील जनतेला स्वतः लक्ष देऊन न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. या संदर्भातील आजची तहसील कार्यालयातील बैठक त्या अर्थाने फार महत्वपूर्ण असून यानंतर हे जनआंदोलन कुठल्या स्थरावर होईल यांची दिशा ठरणार आहे.

Previous articleएल्गार :- एकोना कोळसा खदान बंदच्या जनआंदोलनाला प्रचंड प्रतिसाद,
Next articleलक्षवेधक :- मुख्यमंत्री शिंदे आपल्या समर्थकांसह गुवाहाटीमध्ये का गेले? जाणून घ्या रहस्य.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here