Home वरोरा वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड यांच्यावर कारवाईसाठी वनपाल संघटना आक्रमक.

वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड यांच्यावर कारवाईसाठी वनपाल संघटना आक्रमक.

मुख्य वनसंरक्षक यांना काय दिला वनपाल संघटनांनी इशारा. वाचा सविस्तर.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

वरोरा वनविभागाचे वादग्रस्त वनपरिक्षेत्र अधिकारी मधुकर राठोड यांच्या भ्रष्ट व एकाधिकारशाही वागणुकीचा त्यांच्या अधिनस्त असणाऱ्या अनेक कर्मचारी व अधिकाऱ्यांना फटका बसला आहे शिवाय त्यांनी वनरक्षकाला जिवे मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण वनविभागाच्या प्रधान सचिवांपर्यंत पोहोचले आहे. मुख्य वनसंरक्षक प्रकाश लोणकर यांच्याकडून कारवाई केली जात नसल्याचा आरोप करून १ डिसेंबरला काम बंद आंदोलन करून मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलनं करण्याचा इशारा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला आहे.

वरोरा वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड यांची वनविभागातील कारकीर्द फारच वादग्रस्त राहिली. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक अधिनस्त कर्मचाऱ्यांना त्यांनी वेठीस धरले होते. वनरक्षकाला जिवे मारण्याची धमकी दिल्याने निलंबनाची कारवाई झाल्याशिवाय संघटना स्वस्थ बसणार नाही, असा इशारा संघटनेचे अजय पाटील व विशाल मंत्रिवार यांनी दिला.

दरम्यान या प्रकरणाचा चौकशी अहवाल आल्यानंतरही मुख्य वनसंरक्षक कारवाई करणार असे संकेत आहे. परंतु संघटनेकडून निवेदने दिल्यानंतरही चौकशीचा बनाव करून प्रकरण थंडबस्त्यात टाकले, असा आरोपही संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पाटील यांनी

वनपाल संघटना या संदर्भात अधिक आक्रमक झाली झाली असून ३० नोव्हेंबरपर्यंत आरएफओ राठोड यांच्यावर निलंबनाची कारवाई न केल्यास १ डिसेंबरपासून काम बंद मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करू,असा इशारा विजय रामटेके, भारत मडावी, संघटनेचे पदाधिकारी यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here