Home वरोरा आनंदाची बातमी :- वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांचा कापूस पोहचणार आंतराष्ट्रीय बाजारपेठत.

आनंदाची बातमी :- वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांचा कापूस पोहचणार आंतराष्ट्रीय बाजारपेठत.

कृषी विभागाचा उपक्रमातून शेतकऱ्यांना मिळाली उभारी, शेतकरी मालामाल होणार ?

खांबाडा प्रतिनिधी :-
मनोहर खीरटकर

शेतकऱ्यांच्या शेतपिकांना स्थानिक बाजारपेठत योग्य दर मिळत नसल्याने त्यांचे दरवर्षी कर्ज वाढत असते पण आता शेतकऱ्यांना कृषि विभागाच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठत कापूस विकण्याची नामी संधी मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला भाव मिळून शेतकरी मालामाल होणार असल्याची चाहूल लागली आहे.

ही किमया वरोरा कृषि अधिकारी , यांच्या मार्फत साधली जाणार असून काही गावांमध्ये महाकॉट योजनेअंतर्गत एक गाव एक वाण लागवड करून एकजिनसी कापूस उत्पादित करण्यात आला. अश्या उत्कृष्ट प्रतीच्या कापसाच्या गाठी पारस जिनिंग, वरोरा यांच्या सहयोगाने तयार करून शेतकरी स्वतः गटामार्फत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उतरणार आहे.

याकरिता दिनांक 27 डिसेंबर 2022 ला महाकॉट अंतर्गत कोंढाळा येथील शेतकरी गटांचा कापूस पारस जिनिंग वरोरा येथे प्रोसेसिंग करिता आणण्यात आला यावेळी जिल्ह्याचे स्मार्ट चे नोडल अधिकारी नंदकुमार घोडमारे, उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे, तालुका कृषी अधिकारी गजानन भोयर मंडळ कृषी अधिकारी प्रगती चव्हाण, कृषी अधिकारी मारोती वरभे, भोम्बे ग्रेडर पारस जिनिंग चे अमोल मुथा, किशोर डोंगरकर व पांडुरंग लोखंडे कृषी पर्यवेक्षक टेंभुर्डा, मिनल असेकर, बीटीएम आत्मा वरोरा व गट प्रवर्तक भानूदासजी बोधाने यांचेसह कृषि क्रांती शेतकरी गट, कोंढाळा चे सर्व सदस्य व शेतकरी उपस्थित होते.

पारस जिनिंग चे अमोल मुथा यांचे विशेष योगदान !

आंतरराष्ट्रीय बाजारपेठत पाठविण्यातयेणाऱ्या या कापसावर पारस जिनिंगमधे प्रक्रिया, जिनिंग, प्रेसिंग करून त्याच्या गाठी तयार करण्यात येतील व या उत्पादित गाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर कृषिक्रांती गटाचे नावाने आंतरराष्ट्रीय बाजारात विक्रीकरिता ठेवण्यात येणार आहे. स्वतः च्या कापसाचे मूल्यवर्धन करून आंतरराष्ट्रीय बाजारात उतरून विक्री करण्याची संधी महाकॉट या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना उपलब्ध झाली आहे. त्यात पारस जिनिंगचे अमोल मुथ्था यांचे विशेष योगदान असल्याचे बोलल्या जातं आहे.

तालुका कृषि अधिकारी वरोरा यांनी राबविलेल्या या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना उत्कृष्ठ प्रतीचा कापूस उत्पादित करून स्वतः आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विकण्याची संधी प्राप्त होत आहे. आता शेतकरी व्यापाऱ्यांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरून अधिक नफा कमावतील व जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग आहे असे मत गट प्रवर्तक श्री भानुदास बोधाने यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here