Home वरोरा वरोरा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पत संस्थेच्या निवडणुकीत एकता पैनेल जिंकणार ?

वरोरा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पत संस्थेच्या निवडणुकीत एकता पैनेल जिंकणार ?

संस्थेचे खातेदार यांना मोठा लाभांश देणार. पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष रामचंद्र नागपुरे यांची ग्वाही.

वरोरा प्रतिनिधी :

तालुक्यातील आदेश शिक्षक सहकारी पत संस्थेच्या निवडणूकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून या निवडणुकीत एकता पैनेल आणि प्रगती पैनेल यांच्यात जोरदार लढत होतं असून एकता पैनेल यांच्या सहकाऱ्यांनी निवडणुकीच्या प्रचारात मोठी आघाडी घेतल्याने त्या पैनेल चा विजय होईल अशी एकूण परिस्थिती निर्माण झाली आहे.

एकता पैनलच्या सर्व उमेदवारांनी पत संस्थेच्या सर्व सदस्य व भागधारकांशी संपर्क साधण्यास मोठी आघाडी घेतली आहे व त्यांनी आपला एकता पैनेल च्या जाहीरनामा अगदी स्पष्ट सांगितला आहे. दरम्यान या पैनेल चे अध्यक्ष पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष रामचंद्र नागपुरे यांच्या नेत्रुत्वात पत संस्थेची निवडणूक होतं असून मागील सत्ताधारी संचालकांनी ज्या पद्धतीने पत संस्थेची प्रगती केली नाही त्यात आता आमूलाग्र बदल करून या पत संस्थेच्या भागधारकांना मोठा लाभांश मिळवून देण्याचे ध्येय त्यांनी बाळगले असल्याचे त्यांनी बोलून दाखवले आहे. त्यामुळे त्यांच्या एकता पैनेल ला चांगला प्रतिसाद मिळत आहे अर्थात त्यांची विजयाकडे वाटचाल होतं असल्याची चर्चा आहे.

या पतसंस्थेत करोडोची उलाढाल असली तरी संस्थेच्या संचालकांनी पाहीजे त्या पद्धतीने संस्थेला उभारणी दिली नाही. मात्र आता व्याज दरावर योग्य तो निर्णय घेऊन संस्थेला प्रगतीपथावर नेऊ असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here