Home वरोरा खळबळजनक :- सहाय्यक लेखाधिकारी आनंद कांबळे लाच घेतांना अटकेत.

खळबळजनक :- सहाय्यक लेखाधिकारी आनंद कांबळे लाच घेतांना अटकेत.

पंचायत समिती वरोरा येथील घटना सेवानिवृत्त कर्मचारी यांच्याकडून अर्जित रजेचे सममूल्य मंजुरीसाठी लाचेची मागणी भोवली.

वरोरा प्रतिनिधी :-

पंचायत समिती वरोरा येथे काही महिन्यांपूर्वी सहायक लेखा अधिकारी म्हणून रुजू झालेले आनंद गुरूदास कांबळे सेवानिवृत्त कर्मचारी यांच्याकडून अर्जित रजेचे सममूल्य मंजुरीसाठी लाचेची मागणी केल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याने एकच खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार वरोरा येथील तक्रारदार हे दिनांक ३१/०५/२०२२ रोजी पंचायत समिती वरोरा अंर्तगत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र येथून आरोग्य सहाय्यक या पदावरून नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाले होते. तरी तक्रारदार यांचे अर्जित रजेचे सममूल्य रक्कम ६.५६.६००/- रूपयेचे बिल काढून देण्याचे कामाकरीता आरोपी आनंद गुरूदास कांबळे, सहायक लेखा अधिकारी, पंचायत समिती वरोरा यांनी तक्रारदारास ४,०००/- रूपयेची मागणी केली. तक्रारदार यांना आरोपी आनंद गुरुदास कांबळे, सहायक लेखा अधिकारी, पंचायत समिती वरोरा यांना लाच म्हणून ४०००/- रु. देण्याची त्यांची मुळीच इच्छा नसल्याने त्याचेविरुद लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कार्यालय चंद्रपुर येथे तक्रार दाखल केली.

प्राप्त तक्रारीवरून दिनांक ०४/०१/२०२३ रोजी केलेल्या पडताळणी कार्यवाही दरम्यान आरोपी आनंद गुरूदास कांबळे, सहायक लेखा अधिकारी, यांनी ४०००/-रु. लाचेची मागणी करून तडजोडीअंती २.५००/- रूपये स्विकारण्याची तयारी दर्शविली. त्यावरून आज दिनांक ०५/०१/२०२३ रोजी पंचायत समिती वरोरा येथे सापळा रचून आरोपी आनंद गुरूदास कांबळे, यांला २,५००/-रु. लाच रक्कम स्विकारतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर यांनी आरोपीला रंगेहाथ पकडले व अटक करण्यात आली असुन पुढील तपास सुरु आहे.

सदरची कार्यवाही ही राहुल माकणीकर, पोलीस उपायुक्त / पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नागपुर, श्री. मधुकर गिते, अप्पर पोलीस अधिक्षक ला.प्र.वि. नागपूर, तसेच पोलीस उपअधिक्षक श्री. अविनाश भामरे, ला.प्र.वि. चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात जितेंद्र गुरनुले, पोलीस निरीक्षक, तसेच कार्यालयीन स्टॉफ ना.पो.अ. संदेश वाघमारे, रोशन चांदकर पो. राकेश जांभुळकर, मपोकों पुष्पा काचोळे व चालक पोअं. सतीश सिडाम यांनी यशस्वी पार पाडली आहे.

जनतेला आवाहन !

यापुढे जनतेला कोणीही लाचखोर अधिकारी/कर्मचारी किवा त्यांचे वतीने कोणी खाजगी इसम लाचेची मागणी करीत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Previous articleबेकायदेशीर गौण उत्खनन करणाऱ्या एस,आर,के कंपनीवर फौजदारी व दंडात्मक कारवाई करा,
Next articleआता सावकारी पाशात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे विक्रीपत्र रद्द होणार?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here