Home वरोरा छोटासा गांव असलेल्या बामर्डा गावात गावकऱ्यांनी केली शिवजयंती.

छोटासा गांव असलेल्या बामर्डा गावात गावकऱ्यांनी केली शिवजयंती.

युवक महिला व बुजुर्ग झाले सहभागी, शिवचरित्राचे विचार पसरले गावांत.

प्रतिनिधी—पवन ढोके (माढेळी)

वरोरा तालुक्यातील माढेळी गावाजवळील बामर्डा या छोट्यास्या गावामध्ये युवक महिला व गावांतील बुजुर्ग यांच्या सहभागाने शिवजयंती साजरी करण्यात आली असून शिवचरित्र काय आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य काय आहे याबद्दल सर्व गावकऱ्यांना यानिमित्तानं विचार देण्यात आले.

या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोला हार घालून आणि फुले अर्पण करून गावातील नागरिकांनी शिवजयंती अत्यंत साध्या पध्दतीने साजरी करण्यात आली.शिवजयंती साजरी करताना गावातील जेष्ठ नागरिक माजी ग्रामपंचायत सदस्य सुरेश साळवे उपस्थित होते, त्यांनी गावामध्ये शिवजयंतीचा कार्यक्रम युवकांनी घडवून आणल्या त्याबद्दल खुशी जाहीर केली, शिवजयंती च्या या कार्यक्रमाप्रसंगी गावातील नागरिक पवन ढोके, सुरेश ढोके, सचिन ठावरी,अथर्व ढोके, प्रतीक ठावरी, पितांबर ढोके, सतीश येडमे,प्रवीण ढोके,विशाल ढोके,अविनाश चिकटे,प्रशांत ढोके,गजानन हरबळे, मनोहर उईके, मारोती आत्राम ,प्रवीण ढोके, आकाश अरतपायरे,कमलाकर ठवरी, अरुण येडमे,गावातील महिला शिलाबाई ढोके,आणि इतर महिला उपस्थित होत्या आणि इतर नागरिक उपस्थित होते.

शिवाजी महाराज जयंती प्रत्येक गावात वाहायला पाहजे आणि गावातील प्रत्येक लोकांनी त्याला उत्कृष्ट प्रतिसाद द्याला पाहजे असे बामर्डा गावातील लोकांनी इच्छा व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here