शिवजयंतीच्या दिवशी आयोजित मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानं निर्णय.
वरोरा :-
जिल्ह्यात वरोरा भद्रावती या दोन तालुक्यातील जवळपास 1500 शेताकऱ्यांना प्रशासनाच्या चुकीमुळे कर्जमाफी पात्र असताना कर्जमाफी झाली नाही, जवळपास 2000 नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेली 50 हजार प्रोत्साहन राशी मिळाली नाही तर 3 हजार शेताकऱ्यांना ओला दुष्काळ व अतिवृष्टीचे अनुदान मिळाले नसल्याने शेतकरी हवालदील झाला असून काही बैंक व्यवस्थापकांनी शेताकऱ्यांना नोटीस पाठवून कर्ज भरा अन्यथा तुमचे बैंक अकाउंट शील करू अशी धमकी दिली आहे तर काही शेतकऱ्यांची बैंक खाती शील सुद्धा करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी आता आर्थिक व्यवहार करायचे कसे? हा प्रश्न त्यांच्यासमोर ठाकला आहे. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अशा पिडीत शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शासन प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु असून सध्या मुंबई येथे सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय व्हावा याकरिता शिवजयंती च्या दिवशी म्हणजे 10 मार्चला भव्य बैलबंडी मोर्चाचे आयोजन वरोरा तहसील कार्यालयावर करण्यात आले होते परंतु 10 मार्चला शिवजयंती निमित्य असणाऱ्या शोभा यात्रा व विविध कार्यक्रमाची रेलचेल बघता तुम्ही 10 तारखेनंतर मोर्चा घ्या अशी विनंती पोलीस प्रशासनाने मनसे पदाधिकाऱ्यांना दिल्याने हा मोर्चा आता दिनांक 15 मार्च ला होणार आहे.
15 मार्चला होणाऱ्या या बैलबंडी मोर्च्यात मोठ्या संखेने शेतकरी व महाराष्ट्र सैनिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन मनसेचे राज्य उपाध्यक्ष दिलीप रामेडवार, जिल्हा अध्यक्ष राहुल बालमवार. जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, जिल्हा सचिव विनोद सोनटक्के, शेतकऱ्यांचे नेत्रुत्व करणारे भदुजी गिरसाळवे, मनसेचे विशाल देठे, राम पाचभाई, प्रशांत बदकी, मोहित हिवरकर, अभिजीत पावडे, प्रणय लोणकर. संदीप मोरे, विनोद खडसंग,राजेंद्र धाबेकर, पंकज पेटकर, मनोज गाठले, पवन ढोके, जयंत चौधरी, पंकज पेटकर, धनराज वाटबरवे,शंकर क्षिरसागर, मनोहर खिरटकर अनिल दोमणे, अतुल गावंडे, दिलीप दोहतळे, अभय आसुटकर, प्रमोद हनवते, अशोक दाते, दिनेश जुमडे, शुभम नरड, संदीप धानोरकर, राजु पवार, प्रकाश धोपटे, विष्णू मुंजे, आसिफ शेख, अनिकेत गुजरकर, महिला सेना रेवती इंगोले, पोर्णिमा शेट्टी, शुभांगी मोहरे, अनिता नकवे, ज्योती मुंजे