काळी-पिवळी व ऑटो रिक्षा चालक मालकांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी.19 एप्रिलला मोर्चा
वरोरा :-
महाराष्ट्र सरकारने पुढील निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता मतांच्या राजकारणासाठी एसटी प्रवास करणाऱ्या महिलांसाठी पन्नास टक्के सूट देण्याची घोषणा केली आहे, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात काळी )-पिवळी टॅक्सी व ऑटो रिक्षा चालक मालक यांना प्रवाशी मिळत नसल्याने बैंक कर्ज काढून विकत घेतलेल्या वाहनांचे कर्ज कसे फेडायचे व जीवन जगण्यासाठी घर संसाराला पैसे कसे लावायचे हा यक्ष प्रश्न उभा ठाकला असून त्यांच्यावर उपाशी मरण्याची पाळी आली आहे त्यामुळे राज्य शासनाने महिलांना दिलेली पन्नास टक्के प्रवास सवलत रद्द करावी अशी मागणी मनसेच्या नेत्रुत्वात वाहन चालक मालक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तहसीलदार यांच्या माध्यमातून केली आहे.
कुठलाही निर्णय घेताना जनतेच्या मनात काय आहे व जनतेला कसा याचा फायदा होईल याबद्दल विधानसभा सभागृहात चर्चा व्हायला हवी व त्याबद्दल सर्वेक्षण व्हायला हवे मात्र येणाऱ्या निवडणुकांत फायदा होण्यासाठी जनहिताचा निर्णय म्हणून महिलाना जी एसटी प्रवासात पन्नास टक्के सूट दिली आहे ती काळी पिवळी टॅक्सी व ऑटो रिक्षा चालक मालक यांच्या जीवावर उठली असल्याने हा निर्णय तात्काळ रद्द करावा व जगा व जगू द्या या नैसर्गिक नियमांचे पालन करून सर्वाना जगण्याचा अधिकार प्रदान करावा अन्यथा काळी पिवळी टॅक्सी,ऑटो टॅक्सी चालक मालक यांना घेऊन आंदोलन करण्यात येईल व त्यांना निर्वाह भत्ता शासनाकडून अनुदान म्हणून लागू करण्यास शासनाला भाग पाडू प्रसंगी आपल्यां शासनाच्या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागण्यात येईल असा इशारा निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
येणाऱ्या 19 एप्रिलला तहसील कार्यालयावर मोर्चा.
महिलांना एसटी प्रवासात पन्नास टक्के दिलेली सवलत ही जनहिताचा विचार करून दिलेली सवलत नसून केवळ महिला कर्मचाऱ्याना ही सवलत लागू पडते कारण ग्रामीण भागातील कुठल्याही महिला शहरात नेहमी ये-जा करत नाही तर महिला कर्मचाऱ्यांनाच याचा लाभ मोठ्या प्रमाणांत मिळत आहे जेंव्हा की त्यांचा पगार चांगला असतो व त्यांना ही सवलत देणे चुकीचे आहे आणि सर्वसामान्य महिलांना याचा काहीएक फायदा नसून केवळ लग्न समारंभ व नातेवाईकांच्या गावाला जाणे एवढेच त्यांचे काम असल्याने ज्या महिला कर्मचाऱ्याना गांव खेड्यावर ड्युटी आहे त्यांच्या माध्यमातून काळी पिवळी व ऑटो टॅक्सी चालत असते त्यांनाच पन्नास टक्के सवलत मिळत असल्याने हा सारासार काळी पिवळी व ऑटो टॅक्सी चालक मालक यांच्यावर अन्याय असल्याने शासनाच्या या निर्णयाविरोधात येणाऱ्या १९ एप्रिलला वरोरा तहसील कार्यालयावर त्यांचा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सकाळी ११.३० च्या दरम्यान निघणार आहे.