Home वरोरा ‘मुक्ताई’ ओसंडला; मात्र हौशी पर्यटकांवर मधमाश्यांचा हल्ला अनेक पर्यटक जखमी

‘मुक्ताई’ ओसंडला; मात्र हौशी पर्यटकांवर मधमाश्यांचा हल्ला अनेक पर्यटक जखमी

 

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

शंकरपूर :- माना समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या मुक्ताई पर्यटन स्थळ येथे अवकाळी पावसामुळे धबधबा सुरू झाला असून पर्यटक सोमवारपासूनच या स्थळावर गर्दी करीत आहे. मात्र या परिसरात मधमाश्यांचे पोळे अधिक असल्याने त्यांच्या हल्ल्यात पर्यटक जखमी होताना दिसत आहेत. मंगळवार आणि बुधवारी दोन्ही दिवस मधमाश्यांनी पर्यटकांना जखमी केल्याची माहिती आहे. त्यामुळे पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडत आहे.

शंकरपूरपासून जवळच असलेल्या डोमा येथे पहाडावर मुक्ताई पर्यटन स्थळ आहे. या पहाडावरून कोसळणारा धबधबा पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहेत. हा धबधबा फक्त पावसाळ्यातच सुरू राहतो. पाऊस गेला की हा धबधबा बंद होतो. परंतु अवकाळी पावसाने भर उन्हाळ्यात हा धबधबा सुरू झालेला आहे. सोमवारपासून दररोज पाऊस येत

असल्याने मंगळवारपासून येथे पर्यटकांची गर्दी होत आहे. यासोबतच मंगळवारी रात्री सतत पाऊस आल्याने बुधवारी या धबधब्याची गती वाढली असल्याने बुधवारी शेकडोंच्या संख्येने पर्यटक मुक्ताईचा आनंद लुटण्यासाठी आले होते. बऱ्याच वर्षांनंतर हा उन्हाळ्यामध्ये

मुक्ताईचा धबधबा सुरू झाल्याने पर्यटकांसाठी आनंदाची पर्वणीच निर्माण झालेली आहे. मात्र या ठिकाणी मधमाश्यांचे पोळे मोठ्या प्रमाणात आहे. पर्यटकांची गर्दी वाढल्याने या मधमाश्याचे पर्यटकांवर हल्ले होत आहेत. याच बरेच पर्यटक जखमी झाल्याची माहिती आहे.

यापूर्वी झाला होता दोनदा हल्ला

मंगळवारी मधमाश्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. यात जवळपास २५ ते ३० आणि बुधवारी दुपारी जवळपास ३० ते ३५ लोक या मधमाश्याच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. त्यातील काही जणांनी खासगी दवाखान्यात तर काही जणांनी शंकरपूर येथील प्राथमिक उपकेंद्रात औषध उपचार केलेला आहे. त्यामुळे येथे येताना पर्यटकांनी सावधता बाळगावी, असे आवाहन मुक्ताई समितीकडून करण्यात येत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here