Home वरोरा चिंताजनक :- वरोरा तालुक्यात कोसरसार येथील आरोग्य केंद्रच पडले आजारी?

चिंताजनक :- वरोरा तालुक्यात कोसरसार येथील आरोग्य केंद्रच पडले आजारी?

आरोग्य केंद्राच्या इमारतीला पडल्या भेगा, आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता.

वरोरा (मनोहर खिरटकर)

तालुक्यातील ५४ गावाचा भार वाहत असलेल कोसरसार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अगोदरच कर्मचाऱ्यांची कमरतरता असतांना आता या आरोग्य केंद्राच्या इमारतीला भेगा पडल्या असल्याने हे प्राथमिक आरोग्य केंद्रच आजारी पडले असल्याचा चिंताजनक प्रकार समोर आला आहे.

या आरोग्य केंद्राची नुकतीच डागडुजी झाली खरी पण काम मात्र पुर्ण झाले नाही त्यामुळं कुठे पाणी मुरलं हे कळायला मार्ग नसून येथे दोन डाँक्टरची कायमस्वरूपी निवासी नियुक्ती असताना एका आरोग्य अधिकाऱ्यांकडे चार्ज नाही ते निवासी असतात तर दुसरे आरोग्य अधिकारी ज्यांच्याकडे या आरोग्य केंद्राचा पूर्ण चार्ज आहे सोबतच त्यांना इतरत्र सुद्धा चार्ज आहे ते चंद्रपुरला निवासी असतात त्यामुळे ते वेळेवर हजर नसल्याने रुग्णांची मोठी हेळसांड होतं आहे, काही दिवस तर ते डॉक्टरच दिवसभर येत नाही त्यामुळं रुग्ण उपचारासाठी आले असता त्यांना आले पावली परतावे लागते, येथे चपराशी, ओपिडी कर्मचारी व फिल्ड कर्मचारी, तथा औषध संयोजक पद कित्येक दिवसापासुन रिक्त आहे, रात्री एकही कर्मचारी येथे उपस्थित रहात नसल्याचे येथील येणाऱ्या रुग्णाकडून समजते, त्यामुळं कोसरसारच हे आरोग्य केंद्र जिल्हा प्रशासनाने जणू वाऱ्यावर सोडलं असल्याचं विदारक चित्र दिसत आहे.

येथील ग्रामपंचायत, जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य काय करताहेत ?

आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या भिंतीना भेगा गेल्या असतांना व आताच कुठं पाऊस सुरू झाला अशातच आरोग्य केंद्रात पाणी बदाबदा झिरपत असतांना येथील लोकप्रतिनिधी म्हणून सरपंच पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य नेमके आहे तरी कुठे हेच कळत नाही, दरम्यान खाबांडा येथुन चार किलोमीटर अंतरावर असलेल उपकेन्द्र चौपन गाव येथे जाणारा रस्ता कर्मविर विद्यालय ते दवाखाना पर्यत अंतर पाचशे मीटर पुर्णपणे ऊखडलेला आहे याकडे पण कुणाचे लक्ष नसल्याने या परिसरातील जनतेत मोठा संताप व्यक्त होतं आहे.

Previous articleब्रेकिंग ;-भीम आर्मी चीफ चंद्रशेखर पर जानलेवा हमला.
Next articleखळबळजनक :- माढेळी येथील सरपंचाच्या देशी दारू दुकानातून  बेकायदेशीर दारू पुरवठा ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here