Home वरोरा खळबळजनक :- माढेळी येथील सरपंचाच्या देशी दारू दुकानातून  बेकायदेशीर दारू पुरवठा ?

खळबळजनक :- माढेळी येथील सरपंचाच्या देशी दारू दुकानातून  बेकायदेशीर दारू पुरवठा ?

दररोज लाखो रुपयांचा वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात व माढेळी परिसरात बेकायदेशीर देशी दारू पुरवठा. पोलीस प्रशासन साखर झोपेत ?

माढेळी प्रतिनिधी :-

कुठल्याही गावाचा सरपंच हा त्या गावाच्या विकासासोबतच गावांतील सामाजिक आरोग्य जपत असतो व गावात उद्भवलेले प्रश्न व समस्या सोडवत असतो, पण माढेळी ग्रामपंचायत चे सरपंच देवानंद  महाजन हे जणू येथील सर्वेसर्वा म्हणून आपली तानाशाही गाजवत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस येत आहे,  एकीकडे गावांतील रस्त्यांचा, अतिक्रमनचा, पिण्याच्या पाण्याचा, बाजारपेठेचा व साधनसुविधेचा प्रश्न उभा असताना  दुसरीकडे मात्र यांच्या देशी दारू दुकानातून माढेळी परिसरातील कित्तेक गावात बेकायदेशीर दारू विक्री करिता दारूच्या पेट्या पुरवल्या जातं आहे तर बाजूच्या वर्धा जिल्ह्यातील दारूबंदी असलेल्या हिंगणघाट तालुक्यातील गावात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे देशी दारूचा साठा पोहचविल्या जातं आहे. लाखों रुपयांची उलाढाल होतं असलेल्या या बेकायदेशीर देशी दारू पुरवठा धंद्यात सरपंचाचे फावले पण सामाजिक आरोग्य बिघडविणारे असले सरपंच हे खरोखरंच गावाचा विकास घडवू शकणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान पोलीस प्रशासन मात्र याकडे डोळेझाक करून जणू साखर झोपेत असल्याचे चित्र दिसत आहे.

धानोरा पुलाजवळील धाब्यावर सुद्धा दारू पुरवठा ?

दररोज देशी दारू विक्रीचा उच्चांक गाठण्यासाठी सरपंच देवानंद महाजन यांची व्हाया धानोरा मार्ग हिंगणघाट तालुक्यात लाखों रुपयांची बेकायदेशीर देशी दारू विक्री होतं असतांना धानोरा पुलाजवळ असलेल्या प्रफुल आसुटकर यांच्या धाब्यावर सुद्धा देशी दारू पुरवठा होतं आहे व येथे खुलेआम देशी दारू विक्रीचा अड्डा बनला आहे. दरम्यान देवानंद महाजन यांची प्रफुल्ल आसुटकर सोबत जे युवक काँग्रेस चे अध्यक्ष आहे दोस्ती असल्याने दोघांच्या पार्टनरशिपमधे बेकायदेशीर देशी दारूचा धंदा जोरात सुरू आहे.

स्थानिक बेरोजगार युवकांच्या रोजगारावर आघात ?

काही दिवसांपूर्वी माढेळी ते सोइट रस्त्याशेजारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत लोखंडी पोल गाडून सरपंचांनी जोरजबरदस्ती अतिक्रमण केले होते, आता या जागेवर अतिक्रमण करण्याचा ठराव ग्रामपंचायत ने घेतला असल्याचे बोलल्या जातं आहे, पण आपली हद्द नसतांना व त्या ठिकाणी काही प्रस्तावित योजना आराखडा नसतांना उगाच तिथे विहीर बांधली जाईल अशी थाप देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर अतिक्रमण करण्याची कुठली बुद्धी त्यांना सुचली असावी हे कळायला मार्ग नाही, दरम्यान गावांतील बेरोजगार युवकांना रोजगाराचे साधन उपलब्ध करण्याची नैतिक जबाबदारी सरपंचाची असतांना त्यांचा रोजगार हिरावून सरपंचांना कुठला आनंद मिळतोय ? यांचे आश्चर्य वाटते. गावांतील तरुण बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा म्हणून ग्रामपंचायत प्रशासनाने बांधलेले गाळे ज्यांना गरज आहे त्यांनाच देणे गरजेचे असतांना एकच घरात दोघां दोघांना गाळे आहे, काहींनी गळ्याची तोडफोड करून अतिरीक्त बांधकाम केले आहे तर काहींनी ते गाळे भाड्याने दिले आहे व परस्पर काही गळ्याची विक्री होतं आहे, याकडे सरपंचांनी खरं तर  गांभीर्याने बघून तो प्रश्न सोडवायला हवा परंतु जिथे बेरोजगार तरुण आपला स्वतःचा रोजगार निर्माण करण्याचे धाडस करताहेत तिथे सरपंच आडकाठी करत असल्याने बेरोजगार तरुणांच्या मनात सरपंचा विषयी मोठा रोष निर्माण झाला आहे. त्यांनी वेळीच आपली भूमिका बदलली नाही तर येथील बेरोजगार युवक येणाऱ्या काळात काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.दरम्यान ग्रामपंचायत चे काही गंभीर प्रकार समोर येईल अशी सूत्रांकडून माहिती मिळत आहे.

Previous articleचिंताजनक :- वरोरा तालुक्यात कोसरसार येथील आरोग्य केंद्रच पडले आजारी?
Next articleमाजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टीवार ने वृंदावन नगर,तुलसी नगर,राष्ट्रवादी नगर, मधील इलेक्ट्रिकची समस्या लावली मार्गी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here