शेतकऱ्यांच्या कांदा अनुदानातून पन्नास टक्के रक्कम वसूल करणारा तो व्यापारी आहे तरी कोण?
वरोरा प्रतिनिधी :-
महाराष्ट्रात कांद्याचे दर पडल्या- मुळे शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केले होते. दरम्यान या अनुदानाकरिता अनेक शेतकऱ्यांची यादी जिल्हा आणि तालुका स्थरावर कृषी उत्पन बाजार समिती आणि भाजीपाला बाजारातील व्यापारी यांच्या माध्यमातून करण्यात आली. पण मागील अनेक वर्षांपासून वरोरा तालुक्यात शेतकरी कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात करत नाही व तो कांदा वरोरा कृषी उत्पन बाजार समिती मध्ये कधी विकायला नेत नाही तर मग कांदा उत्पादक शेतकरी वरोरा तालुक्यात आले कुठून ? व त्या शेतकऱ्यांना कांद्याचे अनुदान मिळाले कसे ? हा मोठा गंभीर प्रश्न उभा ठाकला असुन यामध्ये वरोरा कृषी उत्पन बाजार समितीचे अधिकारी व व्यापारी यांनी संगनमत करून व काही शेतकऱ्यांना हाताशी धरून जवळपास 2 कोटी 30 लाख 70 हजार रुपयांचा कांदा अनुदान घोटाळा केला असल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या घोटाळ्यात जे दोषी आहेत त्यांची उच्चस्तरीय चौकशी होऊन गुन्हा दाखल होणारच पण त्या बोगस कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून पन्नास टक्के रक्कम वसूल करणाऱ्या त्या व्यापाऱ्यांची पोलखोल होणार असल्याने व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा अनुदान घोटाळ्यात शेतकरी वांद्यात सापडला असल्याची चर्चा रंगत आहे.
वरोरा कृषी उत्पन बाजार समिती मध्ये भाजीपाला येतं नसल्याने बाजार भरत नाही व तिथे शेतकरी कांदा पण विकत नाही, सोबतच वरोरा तालुक्यात कांदा उत्पादक शेतकरी जवळपास नाही च्या बरोबर आहे, त्यामुळे वरोरा कृषी उत्पन बाजार समिती मध्ये कांदा विकायचा प्रश्नच येतं नाही त्यामुळे तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांना कांदा अनुदान मिळाले ते बोगस लाभार्थी आहेत पण ते लाभार्थी नेमके कोणी बनवले हा महत्वाचा प्रश्न असुन कृषी उत्पन बाजार समिती अधिकारी व तेथील व्यापारी यांच्या माध्यमातून शासनाचे अनुदान लाटण्यासाठी बोगस लाभार्थी दाखविण्यात आले व त्या शेतकऱ्यांना मिळालेल्या अनुदानातून पन्नास टक्के रक्कम वसूल करण्याचा प्लॅन होता हे आता जवळपास शिद्ध झालं आहे. पण बोगस लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांकडून पन्नास टक्के रक्कम नुकतीच वसूल करण्यात आली तो व्यापारी कोण याबद्दल लवकरच मोठा खुलासा होणार आहे.