Home वरोरा दणका :- लेडी सिंघम आयपीएस नयोमी साटम यांची रेती तस्कराविरोधात पुन्हा कारवाई.

दणका :- लेडी सिंघम आयपीएस नयोमी साटम यांची रेती तस्कराविरोधात पुन्हा कारवाई.

फिल्मी स्टाईल ने अचानक रेती घाटात अवतारल्या आयपीएस साटम मॅडम, उर्वरित रेती माफिया झाले अंडरग्राऊंड.

जिथे वरोरा भद्रावती या दोन्ही तालुक्यातील तहसीलदार अवैध गौण खनिज व रेती उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांना प्रोत्साहन देत असल्याने कोट्यावधी रुपयाचा शासनाचा महसूल भरदिवसा चोरी केल्या जातं असतांना जिथे कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी असणाऱ्या पोलीस विभागाला शासनाचा महसूल चोरी होतं असल्याने स्वतः अशा महसूल चोरी करणाऱ्यावर कारवाई करावी लागत असेल तर मग दोन्ही तालुक्याचे तहसीलदार नेमके करत काय आहे? हा प्रश्न पडत आहे. दरम्यान वरोरा भद्रावती या तालुक्यात नव्यानेच रुजू झालेल्या आयपीएस नयोमी साटम यांच्या बेधडक कारवाईने अवैध धंदेवाईक यांचे धाबे दणाणले असून त्यांनी दिनांक 2 मार्च ला पहाटे केलेली रेती घाटावरील कारवाई म्हणजे फिल्मी स्टाईल एका मुख्य हिरोच्या भूमिकेचा सिन त्यांनी साकार केल्याची प्रचिती प्रत्यक्षदर्शीना आल्याची माहिती आहे.

काल दि.०.२/०३/२०२४ रोजी पहाटे पाच वाजता दरम्यान, तालुका वरोरा, ग्राम येवती येथील वेणा नदिच्या, मारोती देवघाटवर काही इसम हायवा, ट्रॅक्टर व जे.सी.बी.च्या साहाने अवैद्यरीत्या रेती उत्खनन करत आहे. अशा गुप्त माहितीवरून सहाय्यक पोलीस अधीक्षक नयोमी साटम वरोरा यांनी फिल्डिंग लावली आणि अगदी फिल्मी स्टाईलने एका डग्यात बसूल रेती घाटात एंट्री केली आणि आरोपीना अटक केली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुकम्मा सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, चंद्रपुर यांचे मार्गदर्शनाखाली ग्रे. पोउपनि विलास बल्की, पोहवा धनराज गेडाम, पोलीस अंमलदार विठठ्ल काकडे,प भाउराव हेपट, रमेश कार्लेवाड, महेश गावतुरे, यांचेसह ग्राम येवती येथील वेणा नदिच्या, मारोती देवघाटवर जाउन लेडी सिंघम म्हणून नावारूपास आलेल्या आयपीएस अधिकारी नयोमी साटम यांनी रेतीघाटावर कारवाई केली असता, १) विशाल मारोती बदकल, रा. मांढेळी, २) गजानन विठठ्ल येडमे, रा.वंदली ३) भोला आत्राम, रा.बोरी ४) लंकेश चंपतराव बदकल, रा.येवती ५) ओमप्रकाश साहु ६) विकासकुमार, ७) गज्जु मांगरूडकर रा. नागरी हे येवती येथील वेणा नदिच्या, मारोतीदेव घाटतुन, अवैद्यरीत्या रेती ‘उत्खनन करून, जे.सी.बी.च्या साहयग्ने, दोन हायवा व एक ट्रॅक्टर मध्ये, भरत असतांना मिळुन आले. वरून घटनास्थळावरून ०२ हायवा, १ ट्रॅक्टर, जे.सी.बी.,०५ मोबाईल, व ८, ब्रास रेती असा एकुण १,०६,१५,००० रू.चा मुद्देमाल जप्त केला व आरोपी विरूध्द कलम-३७९,३४ भादवि, सहकलम-४८ महाराष्ट्र महसुल अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे मार्गदर्शनाखाली, सहायक पोलीस निरीक्षक विनोद जांभळे पोस्टे वरोरा हे करत आहेत.

Previous articleलक्षवेधी :- सरकारी पैशाची उधळपट्टी करून तीन दिवस ताडोबा महोत्सव कशासाठी?
Next articleनागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात चंद्रपूर जिल्हा आदर्श ठरावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here