Home वरोरा राजकीय कट्टा :- कांग्रेस पक्षाकडून जेष्ठ नेते प्रकाश मुथा यांनी ठोकली वरोरा...

राजकीय कट्टा :- कांग्रेस पक्षाकडून जेष्ठ नेते प्रकाश मुथा यांनी ठोकली वरोरा विधानसभेची दावेदारी?

2019 च्या विधानसभा निवडणुकीतचं फुंकले होते रानसिंग, पण बाळू धानोरकर यांच्या दबावाने घेतली होती माघार?

चंद्रपूर :-

2019 च्या विधानसभा निवडणुकीतचं आपली दावेदारी सांगणारे व 2019 च्या विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराचे नारळ आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बैनरच्या माध्यमातून फोडणारे प्रकाश मुथा यांनी बाळू धानोरकर यांच्या दबावाने माघार माघार घेतली होती, परंतु आताच्या 2024 च्या निवडणूकीत कांग्रेस कडून ते प्रबळ दावेदार असल्याचे चित्र दिसत आहे, दरम्यान प्रकाश मुथा यांच्या समर्थकांनी जे बैनर लावून भावी आमदार म्हणून त्यांचा उल्लेख केला तो चर्चेचा विषय असून आधीच कांग्रेस च्या उमेदवारीचे गुडघ्याला बाशिंग बांधून असणाऱ्या त्या सम्भावीत उमेदवाराची धाकधुक सुरु झाली आहे. यावेळी भाजप उमेदवाराला प्रचंड मताधिक्क्याने हरविणाऱ्या खासदार प्रतिभा धानोरकर ह्या खुबच फार्मात असून मीच माझ्या क्षेत्रातील विधानसभेचे उमेदवार ठरविणार असं खुलं आव्हान त्यांनी पक्षांतर्गत विरोधकांना देऊन आपली रनणिती तयार केल्याने त्या संभावित उमेदवरांच्या यादीत प्रकाश मुथा आहे का? की पुन्हा अनिल धानोरकर यांना उमेदवारी देऊन सत्ता घरीच ठेवण्याचा प्लान बनविणार हें पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

जिल्ह्यातील वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्र कांग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे, स्वर्गीय दादासाहेब देवतळे ते स्वर्गीय संजय देवतळे यांनी कांग्रेस पक्षाचा परचम येथे लहरत ठेवला होता, मात्र सन 2014 ला शिवसेनेकडून निवडणूक लढविणारे बाळू धानोरकर यांनी अल्पशा मतांनी संजय देवतळे यांचा पराभव करून इथे शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवली पण नंतर ते सुद्धा कांग्रेस मध्ये गेले आणि खासदार झाले, त्यानंतर प्रतिभा धानोरकर ह्या कांग्रेस च्या आमदार म्हणून निवडून आल्या, महत्वाची बाब म्हणजे कांग्रेस पक्षात कट्टर समजले जाणारे जिल्हा परिषदचे माजी बांधकाम सभापती प्रकाश मुथा यांना मात्र कधी संधी मिळाली नाही, त्यांनी कांग्रेसच्या बहुतांश उमेदवारांना निवडून आणण्यात महत्वाची भूमिका निभावली प्रसंगी आर्थिक मदत सुद्धा केली पण जेंव्हा त्यांना उमेदवारी मिळण्याची संधी होती अगदी त्यावेळी इतरांनी त्यावर ताबा मिळवीला व कांग्रेस चा कट्टर नेता विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात कधी उतारलाच नाही, पण यावेळी त्यांना निश्चितपणे कांग्रेस कडून उमेदवारी मिळेल या आशेने त्यांच्या समर्थकांनी “गोरगरिबांचा कैवारी लाखलखता तारा. वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे भावी आमदार.” असे बैनर लावून कांग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली असल्याचे दिसत आहे.

स्वर्गीय बाळू धानोरकर यांनी जेंव्हा कांग्रेस पक्षांकडून लोकसभा निवडणूक लढवली त्यावेळी प्रकाश मुथा यांना वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात कांग्रेस ची उमेदवारी देऊ अशी बोलणी झाली असल्याची चर्चा होती, मात्र सत्ता आपल्याच घरी राहावी या हेतूने तत्कालीन खासदार बाळू धानोरकर यांनी त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणले आणि प्रकाश मुथा यांना नाईलाजाने कांग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांचा प्रचार करावा लागला, मात्र आता परिस्थिती बदलली आहे आणि कांग्रेस पक्षाशी एवढी वर्ष प्रामाणिक राहण्याची व कांग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या पाठीशी नेहमी भक्कमपने उभे राहण्याची त्यांची त्यागाची भावना लक्षात घेता त्यांना कांग्रेसने उमेदवारी द्यावी अशी मागणी त्यांच्या समर्थकाकडून होतं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here