Home वरोरा धक्कादायक :- वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा घोटाळ्यानंतर पुनः तारण घोटाळा.

धक्कादायक :- वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा घोटाळ्यानंतर पुनः तारण घोटाळा.

ते कोण आहेत घोटाळेवाज, बाजार समितीत कोण भरवतोय बाजार ? सचिव चंद्रशेन शिंदे वादात 

वरोरा :-

कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा येथील कांदा घोटाळा संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असतांना आता त्याच कार्यालयात तारण घोटाळा झाल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला असून ते नेमके कोण घोटाळेवाज आहेत याचा शोध घेणे सुरु आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात कांदा पिकावलाच नाही तरी तो बाजार समितीत आला व शेतकऱ्यांच्या बैंक खात्यात त्यांचे अनुदान आले याविषयी उचस्तरीय चौकशी झाली पण कुणावरही कार्यवाही झाली नाही आता त्याच धर्तीवर तारण घोटाळा झाला असल्याचे निस्पन्न झाले असल्याने या प्रकरणात सुद्धा कुणी दोषी सिद्ध होईल का याबाबत शंका निर्माण होत आहे.

वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव चंद्रसेन शिंदे यांच्या कार्यकाळात तारण योजनेत 46 लाख 62 हजार 190 रुपयाच्या रक्कमेची अपरातफर झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून वादग्रस्त ठरलेल्या सचिव चंद्रसेन शिंदे यांच्या कडून पदभार काढण्यात आला आहे, दरम्यान या प्रकरणी चौकशी समिती गठित करण्यात आली असल्याची माहिती आहे. शेतकरी शेतमाल निघतो तेव्हा भाव कमी असल्यामुळे शेतमाल बाजार समितीत तारण करून ठेवतात व पैसे घेतात आणि भाव वाढल्यावर तो माल विकून तारण म्हणून ठेवलेल्या मोबदल्यात घेतलेली रक्कम परत करून माल विकतात त्यात शेतकऱ्यांना फायदा होतो. याचाच फायदा घेत वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे कॉम्प्युटर ऑपरेटर गारगाटे यांनी तारण नसतानाही तीन शेतकऱ्यांच्या नावाने रक्कम काढली गेली असल्याचा प्रकार नवीन आलेल्या कॉम्प्युटर ऑपरेटर याच्या लक्षात आला. 17 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत या कालावधीत शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम टाकण्यात आल्याची नोंद असून वरोरा शहरातील अनिल मधुकर तडसे, गुरुदत्त महादेव कुळसंगे व परसोडा येथील विजय पुंजाराम कळस्कर यांच्या खात्यात 46 लाख 62 हजार 190 रुपये वळते करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे, दरम्यान हा घोटाळा फक्त 2023-2024 या कालावधी मधील असून चौकशी अंती पुन्हा किती मोठे घोटाळे समोर येईल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान या प्रकारानंतर बाजार समितीचे सचिव चंद्रसेन शिंदे यांच्याकडून पदभार काढून सहायक सचिव सचिन डहाळकर यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला आहे.

बाजार समितीत कोण भरवतोय बाजार?

वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील वर्षी कांदा घोटाळा उघडकीस आला होता, तो घोटाळा 2 कोटी 30 लाख 73 हजार रुपयाचा होता. त्या कांदा घोटाळ्याची चर्चा अख्ख्या महाराष्ट्रात झाली होती व वरोरा बाजार समितीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते, आता पुन्हा शेतक-याच्या तारण योजनेत सुद्धा बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी घोटाळा केल्याने पुन्हा एकदा वरोरा बाजार समितीच्या भ्रष्ट कारभाराची चर्चा जोरात सुरु आहे, मात्र या बाजार समितीत भ्रष्टाचाराचा बाजार कोण भरवतोय व तो आता कोण उठवतोय हे चौकशीअंती समोर येणार आहे.

सचिव व संचालक मंडळाकडे संशयाची सुई?

कुठलाही पैशाचा व्यवहार हा बाजार समितीतील सचिव व सभापती उपसभापती यांच्या स्वाक्षरी शिवाय होत नाही, त्यामुळे बाजार समितीत भ्रष्टाचाराचा खेळ केवळ सचिव खेळू शकत नाही, दरम्यान कांदा घोटाळा झाला तेंव्हा बाजार समितीवर प्रशासक होता, त्यामुळे सचिव कांदा घोटाळ्यात होता पण संचालक मंडळं दोषी नव्हते, मात्र आता संचालक मंडळाकडे संशयाची सुई येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here