Home कोरपणा इंजापुर येथे अंगणवाडी केंद्रात सडलेली केळी वाटप,

इंजापुर येथे अंगणवाडी केंद्रात सडलेली केळी वाटप,

 ग्रामस्थांनी दोषींवर कारवाईची केली मागणी ! 

प्रमोद गिरटकर कोरपना प्रतिनिधी :-

इंजापूर येतील अंगणवाडी केंद्रात आज दिनांक 5 मार्च ला मुलांना केळी वाटप करण्यात आली, ती केळी ही सडलेली वाटप करण्यात आल्याने आदीवासी असलेल्या पेसा अंतर्गत गावात ए पी जे अब्दूल कलाम पोषण आहार योजनेच्या नावाखाली निकृष्ट दर्जाची सडलेल्या केळी देण्यात आल्याने आदिवासीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करणारी ही बाब प्रशासन समजून घेवून संबंधितांवर कारवाई करतील कां ? असा प्रश्न निर्माण झाला आहे, अंगणवाडी सेविका मीराबाई चिंचोलकर व मदतनीस गीता पिंगे यांनी हा प्रकार नेहमीस सुरू ठेवला असल्याच्या तक्रारी आहे. यात गावातील कमळ रामा पेंदोर ,धनेश्वर धुर्वे ,कविता काबडे , रुखमाबाई राऊत हे बातमी ही समजताच युवक कांग्रेस चे राजुरा विधानसभा महासचिव विलास मडावी सदर अंगणवाडी केंद्राला भेट दिली , इंजापूर या लोकांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे, त्यामुळे यातील दोषींवर कार्यवाही करून निलंबीत करण्याची ग्रामग्रस्तांची मागणी आहे.

Previous articleधक्कादायक :-अखेर कैलास अग्रवाल सह इतर कोळसा माफियांना जामीन,
Next articleब्रेकिंग न्यूज :- इराणमधून वरोऱ्यात परतलेली ‘ती’ व्यक्ती कोरोना पिडीत नाही,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here