Home Breaking News सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या दुल्हेशाह बाबा दर्गा येथे उर्स महोत्सव !

सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या दुल्हेशाह बाबा दर्गा येथे उर्स महोत्सव !

 

तीन दिवस चालणार उर्स महोत्सव कार्यक्रम ! 

कोरपना प्रतिनिधी :-

तालुक्यातील प्रसि’द्ध दर्गा जनतेचे श्रद्धास्थान कुसळ येथील दुल्हेशाह बाबा यांचा उर्स कार्यक्रम होळीच्या तीन दिवस अगोदर पासुन दरवर्षी होत असते, या उर्स ला तालुक्यातील व तालुक्या बाहेरील जनता हजेरी लावुन आपले नवस  पुर्ण करण्यासाठी दर्ग्यावर नतमस्तक होतात. तिन दिवस चालणाऱ्या या उर्सला मोठ्या प्रमाणात जत्रा भरत असते व विविध कार्यक्रमांचे सुद्धा आयोजन करण्यात येते, सर्वच जाती धर्माचे लोक  या ठिकाणी हजेरी लावत असतात या वर्षी दिनांक ६ मार्चला सुरु होणारा उर्स आठ तारखेला संपणार आहे.कौमी एकता समारोह या कार्यक्रमाचे अध्यक्ष बल्लारपूर चे आमदार तसेच माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे राहणार असुन उदघाटक खासदार बाळुभाऊ धानोरकर हे राहणार आहे तर विषेश अतिथी म्हणून सुभाष भाऊ छोटेआमदार, किशोर जोरगेवार, माजी आमदार संजय धोटे राहणार आहेत प्रमुख पाहुणे म्हणून चंदनसींग चंदेल, अहेते शाम अली, हरीष शर्मा, राजेंद्र वैद्य, गोदरुपाटील जुमनाके, विजयरावजी बावणे, सतीश धोटे, अरुण नवले, अँड शाकीर मलक, इमारती भाई, सोहेल भाई, मिनाज भाई, वसंता मडावी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत तर आठ तारखेला वसीम साबरी रेडीओ टिव्ही सिंगर दिल्ली व रुबीताज रेडीओ टिव्ही सिंगर मुंबई यांचा दुय्यम कव्वाली चा शानदार मुकाबला होणार आहे तरी समस्त जनतेने याचा लाभ घ्यावा असे आवाहन सय्यद आबिद अली, रऊफ खान वजीर खान, बाबाराव सिडाम, मनसुर भाई पारेख यांनी केली आहे या कार्यक्रमाला जिवती, राजुरा, वणी, बल्लारपूर, अशा विविध ठिकाणावरून जनता येत असतात विशेष म्हणजे या कार्यक्रमाला सर्व जाती धर्माची जनता एकत्र येवून आनंदाने कार्यक्रम पार पाडतात तीन दिवस कुसळ येथे मोठी रेलचेल राहते

Previous articleब्रेकिंग न्यूज :- इराणमधून वरोऱ्यात परतलेली ‘ती’ व्यक्ती कोरोना पिडीत नाही,
Next articleकोरोना व्हायरसच्या संभावित धोक्याने वरोरा येथील आनंदवनात यावर्षी धुलिवंदन उत्सव होणार नाही,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here