Home वरोरा कोरोना व्हायरसच्या संभावित धोक्याने वरोरा येथील आनंदवनात यावर्षी धुलिवंदन उत्सव होणार नाही,

कोरोना व्हायरसच्या संभावित धोक्याने वरोरा येथील आनंदवनात यावर्षी धुलिवंदन उत्सव होणार नाही,

डॉ.विकास आमटे यांचे एका पत्रकाद्वारे आनंदवन वाशीयांना आव्हान,

वरोरा प्रतिनिधी :-

जगात सर्वत्र कोरोना व्हायरस मुळे हजारो लोकांचे प्राण गेले असून लाखों लोकांना ह्या कोरोना व्हायरस ची बाधा झाली आहे, चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे सुद्धा कोरोना व्हायरसचा रुग्ण असल्याच्या अफवा पसरल्या होत्या व प्रसारमाध्यमांनी सुद्धा ती बातमी  लावून धरली होती, महत्वाची बाब म्हणजे ज्या चिन या देशात मोठ्या प्रमाणात कोरोना व्हायरसने लाखों नागरिकांना पछाडले आहे त्या देशात हजारो लोकांचे जीव गेले आहे, त्यामुळे त्या देशातील रंग, पीचकाऱ्या, खेळणी व इतर वस्तू ज्या भारतात येतात त्याद्वारे सुद्धा कोरोना व्हायरस येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून आरोग्याच्या द्रुष्टीने यावेळी आपल्या आनंदवन प्रकल्पात धुलिवंदन अर्थात रंगपंचमी साजरी न करण्याचा निर्णय आनंदवन महरोगी सेवा समितिचे सचिव डॉ. विकास आमटे यांनी घेवून आनंदवन परिवारातील सदस्यांना त्यांनी मंगळवार दिनांक १०,३,२०२० रोजी होणाऱ्या धुलिवंदन या सामूहिक कार्यक्रमाचे आयोजन आपण यावर्षी करणार नसल्याचे आव्हान केले आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here