जिजाऊ क्रांती दल व जय अंबे शारदा मंडळानी आयोजित केलेल्या कार्यक्रमात गावखेड्यातून महिलांची उपस्थिती.
वरोरा :-
जिजाऊ क्रांती दल च्या माध्यमातून वरोरा तालुक्यातील महिलांसाठी विविध उपक्रम, कार्यक्रम व त्यांच्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करत असते, यातून कित्तेक महिलांना स्वतःचा रोजगार सुरु करता आला, महिलांच्या विविध समस्या व त्यांच्यावर आलेले संकट यावेळी जिजाऊ क्रांती दल च्या पदाधिकारी यांनी नेहमीच मदतीचा हात देत त्या महिलांना आधार दिला अशा या जिजाऊ क्रांती दल च्या महिलांनी योगिता लांडगे यांच्या नेतृत्वात सन्मान स्त्री शक्तीचा हा महिलांचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, नवरात्रीच्या पावन पर्वावर जय अंबे शारदा मंडळ यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन काल दिनांक 10 ऑक्टोबर ला दुपारी करण्यात आले होते. या कार्यक्रमाला गावखेड्यातून मोट्या संख्येने महिला उपस्थित झाल्या.
जिजाऊ क्रांति दल आणि जय अंबे शारदा मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने सन्मान महिला शक्तीचा या कार्यक्रमाचं यशस्वी आयोजन जिजाऊ क्रांति दल अध्यक्ष योगिता जगदीश लांडगे यांचें नेतृत्यात करणात आलं, नवरात्री उत्सवाच्या निमित्याने महिलांनी आपल्यातील कलागुणांना वाव देउन गाव विकासामध्ये सहभागी होऊन गाव आणि देशाच्या विकासात हातभार लावत जन सामान्य माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी एकजुटीने एकत्र यावे असे आवाहन करण्यात आले.
कार्यकमाचे सूत्रचालन पेंदोर मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन मनिषा लोनगाडगे यांनी केले, या कार्यक्रमाला उपस्थित माया राजूरकर यांना आचार्य पदवी प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला, कार्यक्रमा मध्ये व्हराटे मॅडम, जीवतोड मॅडम, रशिदा शेक , ज्योती लांडगे, सारिका धांडे आणि अनेन महिलांनी मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमाला आलेख राठे आणि मंडळातील सर्व कार्यकर्त्यांनी आणि वंदना कथेते, बदकी ताई, चोधरी ताई, प्रीती कुत्र्मारे. सविता देठे इत्यादींनी सहकार्य केले