रस्ते बांधताना चौकात सामूहिक बैठकीच्या ठिकाणी पाणी साचल्याने लहान मुले व वृद्धांच्या आरोग्यास धोका.
वरोरा ता.प्रतिनिधी :-
तालुक्यातील वर्धा जिल्ह्याच्या अगदी सीमेला लागून असलेल्या कोसरसार ग्रामपंचायत चे उपसरपंच यांच्यावर पैशाची अफारतफर प्रकरणी जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात सदस्यत्व रद्द होण्याची सुनावणी सुरु असताना आता या गावात सिमेंट रस्ते बांधकामात सुद्धा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहें, या सिमेंट रस्त्याचे बांधकाम करतांना चौकात सामूहिक बैठकीच्या ठिकाणी पाणी साचल्याने लहान मुले व वृद्धांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्याचे चित्र आहें, दरम्यान याबाबत कंत्राटदार आणि सरपंच उपसरपंच यांच्याकडे स्थानिक नागरिकांनी तक्रार करून सुद्धा पाणी साचू नये याबाबत कुठलेही नियोजन ग्रामपंचायत स्थरावर केले गेले नसल्याने गावातील नागरिकांनी आक्रोश व्यक्त केला आहें.
गावाच्या विकासात सरपंच उपसरपंच हा महत्वाचा दुवा आहें मात्र जर सरपंच उपसरपंचचं आलेल्या निधीचा दुरुपयोग करून विकासाला खिळ लावत असेल तर त्या गावाची दुर्दशा होण्यापासून कुणी रोखू शकतं नाही, अनेक पक्षीय राजकारणात विखूरलेल्या कार्यकर्त्यांनी किमान गावाच्या विकासासाठी एकत्र यायला हवे पण दारूच्या अमिषाला बळी पडून आपले अस्तित्व विसरलेल्या व आपण विरोध केला तर संबंध खराब होणार या भीतीने कोण विरोध करणार या मानसिकतेत वावरणाऱ्या कार्यकर्त्यामुळेचं कोसरसार गावात विकास झाला नसल्याचे बोलल्या जात आहें,
पंचायत समितीतील अभियंते काय करताहेत?
गाव खेड्यावर चे कुठलेही बांधकाम किंव्हा विकास काम असो त्याची पाहणी व काम व्यवस्थित झाले की नाही याची चौकशी करण्याचे व त्याबद्दल दिशानिर्देश देण्याचे अधिकार पंचायत समिती बांधकाम अभियंत्याला असतें पण तें नेमके काय करताहेत? हेच कळतं नसून केवळ टक्क्याचे गणितंच तें करतात का? असा प्रश्न निर्माण होत आहें, दरम्यान आता कोसरसार गावातील त्या चौकातील बांधकाम व चौकात साचलेले पाणी कोण काढेल? आणि स्थानिक गावाकऱ्यांचे कोण समाधान करेल हे पाहणे ऑस्तुक्याचे ठरणार आहें.