चार दिवसापूर्वी सौरभ झाडेला जीवे मारण्याची धमकी देणारे ढेंगळे ऐन स्वातंत्र्य दिनांच्या दिवशी रुग्णालयात?
वरोरा प्रतिनिधी:-
वरोरा तालुक्यातील चिनोरा या गावात एका मोबाईल टॉवर वरून राजकारणं पेटलं असून चार दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे नेते अविनाश ढेंगळे यांनी गावातील सौरभ झाडे नामक युवाकाला मोबाईल वरून आईच्या नावाने अश्लील भाषेत शिवीगाळ करून व त्याच्या घरी जाऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याने याचेवर कलम 351(2) , 352 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता, ती घटना ताजी असताना पुन्हा अविनाश ढेंगळे यांनी एका गावातील व्यक्तीला मारहान करण्याच्या नादात स्वतःचं मार खावा लागला असल्याची गंभीर घटना स्वातंत्र्य दिनी घडली असल्याने सर्वत्र जोरदार चर्चा आहे, दरम्यान वरोरा पोलीस स्टेशन मध्ये दोन्ही बाजूने तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत अशी माहिती असून अविनाश ढेंगळे यांना रुग्णालयात भरती केले असल्याची चर्चा आहे.
वरोरा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश उर्फ चिरकुटा ढेंगळे यांनी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी लबाडी करून मातीमोल भावाने विकत घेतल्या त्या जमीनीच्या खरेदी व्यवहार बाबत अनेक प्रकरणे न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे, दरम्यान गावात सुद्धा त्यांनी अनेकांशी वाद घालून दहशत पसरवली आहे, अशातच सौरभ झाडे नामक युवक यांनी गावात जो मोबाईल टॉवर आहे त्याची NOC दिली का एवढा साधा आणि सरळ प्रश्न ग्रामपंचायत सदस्य बोथले यांना विचारला असता त्यांनी म्हटले की आमचेकडे बहुमत आहे, आणि त्या बळावर आम्ही टॉवर ला NOC दिली आहे, ही बाब अविनाश ढेंगळे यांना कळताचं त्यांनी सौरभ झाडे याला फोन केला आणि तू ग्रामपंचायत सदस्य आहे का? तू कशाला माझ्या ग्रामपंचायत सदस्याला NOC विचारला असे म्हटल्यावर मी सदस्य नाही पण तुम्ही पण सदस्य नाही असे उत्तर सौरभ ने दिल्यानंतर त्यांनी सौरभ ला आईच्या नावाने अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली, त्यामुळे सौरभ गेली तीन दिवस भीतीमुळे गावाबाहेर होता, मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्याला साथ देऊन पोलीस अधीक्षक यांच्याकड़े तक्रार द्यायला लावली आणि पत्रकार परिषद घेऊन अविनाश ढेंगळे यांचेवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी केली होती.
टेमुर्डा प्रकरणात ढेंगळे याला झाली होती जेल..
वरोरा तालुक्यातील टेमुर्डा येथील शेतात सुरू असलेले बांधकाम बघण्यासाठी अमृत पांडूरंग आगलावे (६१) हे वृध्द शेतकरी गेले होते दरम्यान जुन्या वादावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष चिरकुटा गोपाळ ढेंगळे व त्याची पत्नी वंदना चिरकुटा ढेंगळे यांनी त्यांचेवर प्राणघातक हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. या घटनेची तक्रार वरोरा पोलिस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी फिर्यादी यांना सहकार्य न करता आरोपी ढेंगळेना सहकार्य करीत थातूरमाथूर कारवाई केल्याचा आरोप अमृत आगलावे यांची मुलगी अर्चना गाडगे यांनी दि. १९ नाव्हेंबर 2022 ला जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत केला होता. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणी तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी नोपानी यांच्याकडे चौकशी दिली असता त्यांनी तात्काळ या प्रकरणाची दखल घेऊन आरोपी ढेंगळेवर कलम 324 शिवाय आणखी 307 सारखे गंभीर गुन्हे दाखल करून अटक केली होती व न्यायालयाने त्यांना जेल मध्ये पाठवले होते.