माती मिश्रित मुरूम असल्याने रस्त्यात चिखल दुचाकी पण चालेना..
टेमुर्डा (धनराज बाटवरवे ):-
वरोरा तालुक्याच्या टेमुर्डा मोवाडा- पिजदुरा रस्त्याची गिंट्टी मुरुम उखडल्याने दुरावस्था झाली आहे, दरम्यान वारंवार शासन व प्रशासनाचे याकडे लक्ष वेधण्यात आल्यानतर रस्ता दुरुस्तीचे काम मंजूर करण्यात आले, त्यासाठी गिट्टी आणि मुरुम रस्त्यावर टाकण्यात आली व रस्ता दुरुस्तीचे काम सुरू केले परंतु रस्त्यावर गिंट्टी मुरुम रोड वर पसरवनात आली त्या मुरुमामध्ये मोठ्या प्रमाणात माती असल्यामुळे गिंट्टी रोड वर पाणी पडला की चिखल होत आहे, या रस्त्याने साधी दुचाकी चालविणे कठीण झाले आहे, दरम्यान या रस्त्यावर मुरूम गिट्टी वर जर रोड लोलर ची घोटाई झाली असती तर रस्ता मजबूत झाला असता पण कंत्राटदार आणि प्रशासनाचे अधिकारी यांचे अक्षम दुर्लक्ष तेथील गावकरी शेतकऱ्यांच्या अपघाताची वाट पाहत आहे का असा गंभीर प्रश्न उपस्थित होतं आहे.
या रस्त्याची झालेली दुर्दशा बघून आमचे प्रतिनिधी यांनी कंत्राटदार यांचेशी संपर्क साधला असता रस्ता दुरुस्ती चे सामान मिळतं नसल्यामुळे उशीर होतं असल्याची त्यांनी प्रतिक्रिया दिली, मात्र या रस्त्याने मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली असतांना व शेतकरी बैलबंडी याचं मार्गाने ने-जा करत असल्यामुळे रस्त्याचं अक्षरशः चाळण झालं आहे, या भागातील राजकीय मंडळी साखरझोपेत असल्यामुळे हा रस्ता कधी होईल याकडे सर्व गावाकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.