स्थानिक नगरपरिषद प्रशासनाच्या गफलतपणामुले बाहेरून येणाऱ्या मटण विक्रेऱ्यांना मिळाले होते अभयदान…
वरोरा प्रतिनिधी :-
वरोरा शहराच्या माढेळी नाका, बोर्डा चौक, मोहबाळा रोड इत्यादी भागात मोठया प्रमाणात परप्रांतीय मटण विक्रेत्यांनी बेकायदेशीरपणे रस्त्याच्या बाजूला उघड्यावर मटण विक्रीचे दुकानं थाटले होते, या संदर्भात मनसे पदाधिकारी आणि खाटीक समाज बांधव यांनी नगरपरिषद येथे तक्रार दिली व बेकायदेशीर मटण विक्रीचे दुकानं हटवून ते कायमस्वरूपी बंद करण्याचे आदेश दिले होते, मात्र श्रावण मांस संपल्यानंतर आता मटण विक्री जोरात होईल या उद्देशाने पुन्हा परप्रांतीय मटण विक्रेत्यांनी दुकानं सुरू करण्याची तयारी करून आपले शेड उभे केले होते, ही माहिती मिळताच खाटीक समाज बांधबानी मनसे स्टाईल आंदोलनाचा पवित्रा घेत शहराच्या माढेळी नाका, बोर्डा चौक, मोहबाळा रोड इत्यादी भागात परप्रांतीय मटण विक्रेत्यांनी उभे केलेले शेड तोडून हल्लाबोल आंदोलन केले, दरम्यान वरोरा पोलीस स्टेशन मध्ये या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली, परंतु प्रशासनाने उघड्यावर बेकायदेशीर मटण विक्रीचे दुकानं लावू नये हा आदेश अगोदरचं दिल्याने पोलीस प्रशासनाने परप्रांतीय मटण विक्रेऱ्यांना दुकाने लावण्यास मज्जाव केला आहे, त्यामुळे खाटीक समाज बांधवाच्या मनसे स्टाईल आंदोलनाला यश मिळाले आहे.
राज्यात आणि जिल्ह्यात सगळीकडे स्थानिक रोजगार हे बाहेरून आलेल्या परप्रांतीय लोकांनी हिरावून घेतले असल्यामुळे स्थानिक मराठी बेरोजगार तरुणांना काम मिळतं नाही, ते कामाच्या शोधात भटकत असल्याचे विदारक चित्र असतांना आता खाटीक समाजाच्या परंपरागत मटण विक्रीच्या व्यवसायात सुद्धा परप्रांतीय लोकांनी आपले बस्थान बसाविण्याचा प्रयत्न चालवला होता, मात्र वरोरा येथील खाटीक समाज बांधवानी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांचेशी संपर्क साधून परप्रांतीय मटण विक्रेत्याविरोधात आवाज उचला कारण आमचे परंपरागत व्यवसाय यामुळे आर्थिक संकटात आहे, त्यामुळे मनसे तर्फे सर्व खाटीक समाज बांधवाना घेऊन नागपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आले व नगरपरिषद प्रशासनाने परप्रांतीयांचे मटण विक्रीचे उभे केलेले रस्त्याच्या कडेवर चे सगळे दुकाने काढून टाकले, मात्र आता श्रावण महिन्यात मांस मटण विक्रीचा व्यवसाय काहीचा मंदावला होता आणि पुढे बडगा (पाडवा) असल्यामुळे मटण विक्रीचा उच्चांक गाठल्या जातो व चांगला नफा मिळतो त्यामुळे पुन्हा परप्रांतीय मटण विक्रेत्यांनी आपले मटण विक्रीचे दुकानं थाटण्याचा प्रयत्न चालवला होता तो खाटीक समाज बांधवानी हाणून पाडला..
परप्रांतीयांची मराठी माणसावर दादागिरी?
वरोरा पोलीस स्टेशन मध्ये रस्त्याच्या कडेला बेकायदेशीर मटण विक्रीचे दुकानं लावू नये अशा सूचना उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांनी दिल्यानंतर सुद्धा परप्रांतीय मटण विक्रेत्यावर साथ देण्यासाठी 15 ते 20 लोकं पोलीस स्टेशन परिसरात आले होते, यावरून स्थानिक मराठी खाटीक बांधवांचे मटण विक्रीच्या व्यवसायावर परप्रांतीय दादागिरी करून आक्रमण करणार तर नाही असा प्रश्न निर्माण होत आहे, परंतु उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल आणि पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांच्या पोलिसी खाक्यासमोर त्यांचा प्रताप चालणार नाही अशी स्थिती आहे.