Home वरोरा लक्षवेधक :- हाणामाऱ्या धमक्या च्या वातावरणात चिनोरा येथील उद्याला होणारी ग्रामसभा गाजणार?

लक्षवेधक :- हाणामाऱ्या धमक्या च्या वातावरणात चिनोरा येथील उद्याला होणारी ग्रामसभा गाजणार?

चिनोरा गावातील सुज्ञ नागरिक उद्याला अवैध मोबाईल टॉवर च्या NOC ला विरोध करणार का?

वरोरा (चिनोरा):-

वरोरा शहराला व आनंदवनला लागून असलेला चिनोरा गाव सध्या वेगळ्याचं तणावात आहे, ग्रामपंचायत अंतर्गत मोबाईल टॉवर ला NOC आहे का? एवढा साधा आणि सरळ प्रश्न एका युवकांनी ग्रामपंचायत सदस्य यांना विचारला आणि त्या प्रश्नावरून सत्ताधारी बहुमत असलेल्या पेनेल च्या प्रमुखांनी आपली चिरंपरिचित भूमिका निभावून प्रश्न विचारणाऱ्या युवकांस आई वरून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याने प्रकरण पोलीस स्टेशनं मध्ये गेले, हे प्रकरण सुरू असतांना परत पुन्हा त्याचं नेत्याला काही युवकांनी झोडपलं आणि पुन्हा प्रकरण पोलीस स्टेशन मध्ये पोहचलं परंतु आता उद्याची चिनोरा येथे होणारी ग्रामसभा कशी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चिनोरा या गावात अनेक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत, परंतु सामना होतो तो राष्ट्रवादी चे अविनाश ढेंगळे आणि इतर आणि आता तोच सामना होत असून गावाचा कारभार जणू आपल्याकडेच आहे बाकी सरपंचं वैगेरे माझ्यासमोर काहीही करणार नाही अशा तोऱ्यात वावरणारे अविनाश ढेंगळे यावेळी मात्र गावातील नागरिकांच्या टार्गेट वर असून ग्रामपंचायत ची मोबाईल टॉवर साठी NOC न घेता टॉवर उभे झाले कसे? कुणाच्या परवानगीने ते झाले असे प्रश्न गावातील प्रत्येकाला पडले आहे, विशेष म्हणजे गावंच्या सरपंच यांना विचारले असता कंपनी ठेकेदारांनी NOC करिता अर्जच दिला नाही आणि जोपर्यंत कंपनी चा अर्ज ग्रामपंचायत ला मिळतं नाही तोपर्यंत त्यावर विचार होत नाही, मात्र दुसऱ्या गटाचं म्हणणं आहे की आम्ही NOC बहुमताने पास केली आहे, त्यामुळे उद्या होणाऱ्या ग्रामसभेत हा विषय चर्चीला जाणारं आहे व कुणाच्या वयक्तिक फायद्यासाठी NOC देऊ नये तर जर चिनोरा गावासाठी कंपनी कडून काही भरीव मदत होत असेल तर NOC ला कुणाचा आक्षेप असणारं नाही असं काहींच मतं आहे त्यामुळे सत्यधारी गटाविरोधात सगळं गाव एकवटलं तर मासिक सभेत घेतलेला मोबाईल टॉवर च्या NOC ठरावं ग्रामसभेत रद्द होऊ शकते त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी उद्याच्या ग्रामसभेत जाण्याचे आवाहन काही जागृत नागरिक यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here