Home भद्रावती धक्कादायक :- गजानन महाराजांचा भक्त म्हनविणाऱ्या डॉक्टरांनी स्वतःच्याच क्रुत्याची बनविली अश्लील चित्रफित?

धक्कादायक :- गजानन महाराजांचा भक्त म्हनविणाऱ्या डॉक्टरांनी स्वतःच्याच क्रुत्याची बनविली अश्लील चित्रफित?

मांजरी पोलिस स्टेशन मधे काही संशयित ताब्यात ? भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टलच्या पहिल्या बातमीने हडबडलेल्या डॉक्टरांनी पत्रकारांना गोवण्याचा केला प्रयत्न, अश्लील चित्रफीत बनविण्याऱ्या त्या डॉक्टरांवर सुद्धा गुन्हा दाखल होण्याची शक्यता ! कर्तव्यदक्ष ठाणेदार सदाशिव ढाकणे करणार या प्रकरणाची सखोल चौकशी !

मांजरी /भद्रावती प्रतिनिधी :-

स्वतःला श्रदेय गजानन महाराजांचा भक्त म्हनविनाऱ्या एका डॉक्टरांचा प्रताप बघून स्वतः साक्षात गजानन महाराजांना सुद्धा अशा भक्तावर संताप व्यक्त करण्याची इच्छा होईल एवढे क्रूरकर्म डॉक्टरांनी केले आहे यातच आपले बिंग फुटून आता आपली इज्जत जाईल या हेतूने बातमी प्रकाशित झाल्यानंतर चक्क पत्रकारांनाच फसवीण्याचा डाव खेळणाऱ्या त्या डॉक्टरांचे आणखी काही लफडी बाहेर येण्याची चिन्हे दिसत आहे.
आजचा काळ हा कोरोना संक्रमणामुळे ढवळून निघाला असतांना सुद्धा उच्च परिवारातील कौटुंबिक विवाद सुद्धा समोर येत आहे, अशातच मांजरी परिसरातील एका नामांकित डॉक्टरांची एका महिलेसोबतची अश्लील चित्रफीत चर्चेचा विषय बनली असून स्वतःच्या खुशीसाठी व मौजमजा करण्यासाठी स्वतः डॉक्टरांनी काढलेली ती अश्लील चित्रफीत आता डॉक्टरांसोबतच ज्यांना मिळाली त्यांच्यासाठी पण धोकादायक ठरत आहे, कारण ज्या प्रकारे स्वतः डॉक्टरांनी ही अश्लील चित्रफीत मोबाईल द्वारे काढली त्यात ते स्वतः दोषी असल्याने त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो तर दुसरीकडे काही दिवसापूर्वी त्यांना त्या चित्रफितीच्या माध्यमातून ब्लैकमेल करणाऱ्या लोकां विरोधात मांजरी पोलिस स्टेशन मधे तक्रार दाखल केली होती त्याची चौकशी आता सुरू झाली असून काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहीती आहे.

हे डॉक्टर या क्षेत्रात फार चित्र विचित्र पणे वागत असल्याच्या चर्चा असतांनाच भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टल च्या हाती चर्चेतून माहीती आल्याने दिनांक २३
मे ला बातमी प्रकाशित झाली होती. त्यानंतर डॉक्टरांचा एका मध्यस्थीच्या सहाय्याने पत्रकारांशी संपर्क झाला होता मात्र कसेही करा पण मला वाचवा हे बोलबच्चन बोलणाऱ्या डॉक्टरांनी एक वेगळाच प्लान तयार केला होता व स्वतः पाप करणाऱ्या डॉक्टरांनी चक्क माहीती घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारांनाच फसवीण्याचा प्रयत्न केला व स्वतः संपादकांना फोन करून पैशाची जाणीवपूर्वक गोष्ट काढून व ज्यांच्याकडे अश्लील चित्रफीत आहे त्याचे नाव सांगा असा तगादा लावून त्याचे रेकॉर्डिंग तयार करण्याचा डाव त्यांनी खेळला जे आता स्पष्ट झाले आहे.मात्र हे प्रकरण पोलिस स्टेशन मधे जाणार व डॉक्टरांसोबतच इतरांवर सुद्धा गुन्हे दाखल होणार असे भाकीत अगोदरच भुमीपुत्राची हाक मधे प्रकाशित करण्यात आले होते. त्यामुळे आता या प्रकरणात सहाय्यक पोलिस निरीक्षक नेमकी काय भूमिका घेतात ?यावर सर्वकाही अवलंबून असून डॉक्टरांवर सुद्धा गुन्हे दाखल होण्याचे संकेत मिळत आहे. या संदर्भात पत्रकारांचे एक शिष्टमंडळ उपविभागीय पोलिस अधिकारी पांडे यांची भेट घेवून या प्रकरणाची सखोल चौकशी करा व डॉक्टरांच्या क्रुष्णक्रुत्यावर अंकुश लावा अशी मागणी करणार असल्याची माहीती आहे शिवाय डॉक्टरांच्या मुख्यालयी सुद्धा त्यांच्या विरोधात तक्रार दाखल होण्याचे संकेत मिळत आहे.

Previous articleउपक्रम :- ऊपविभागीय अधिकारी शिंदे यांच्या अनोख्या उपक्रमांची रेती माफियांना धडकी. जप्त  केलेली रेती थेट तहसीलदार कार्यालयात !
Next articleब्रेकिंग न्यूज :- एसीसी सिमेंट कंपनीमे हूये हादसे की जांच शुरू.मैनेजमेन्ट के लापरवाही से हादसा,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here