Home भद्रावती केंद्र सरकारच्या खाजगीकरणाच्या विरोधात वेकोली कामगारांचा एल्गार !

केंद्र सरकारच्या खाजगीकरणाच्या विरोधात वेकोली कामगारांचा एल्गार !

आजपासून तीन दिवसांचा संप ; वेकोलीला कोट्यावाधीचा बसणार फटका !

भद्रावती,

केंद्र सरकारचा खाजगीकरण करण्याची भूमिका बघता वेकोली क्षेत्रात भविष्यात येऊ घातलेल्या खाजगी करणाचा विरोधात माजरी वेकोली क्षेत्रातील संपूर्ण कामगार संघटना पुढे सरसावल्या असून उद्या दि 2 जूलै पासून तीन दिवसाचा संप त्यांनी पुकारला आहे.या संपात क्षेत्रातील सर्वच कामगार संघटनेचा सहभाग असल्यामुळे वेकोलीचा कोळसा खाणी बंद पडून वेकोलीला कोट्यावाढी रुपयांचा फटका बसणार आहे.खाजगीकरणाचा विरोधातच अन्य मागण्याही या कामगार संबंधित शासनापुढे ठेवल्या आहेत.वेकोली माजरी येथे कोळशाच्या तीन खाणी असून त्यात 20 हजार 100 कामगार कार्यरत आहेत इंटक,बी एस एस,एच एम एस,आयटक,सिटू, व एस टी एस टी,कौन्सिल या कामगार संघटना कामगारांचा हितासाठी कार्यरत आहे.याविरोधात 2015 मध्ये संप करण्यात आला होता मात्र त्यावेळी खाजगीकरण करण्यात नसल्याचे केंद्राकडून आश्वासन देण्यात आले होते.
केंद्राने निर्णय कोळसा खाणीचे खाजगीकरण हालचाली सुरू करण्यात आल्या.या संपाच्या मध्येमातून कोळसा उद्योगातील बंद करा सी आय एल, व ए सी सी एल,च्या खाजगीकरणात रोख लावण्यात यावी सी एम पी डी आय एल, ला कोल इंडियापासून वेगळे करण्याचा आदेश मागे घ्या सी आय एल, व एस सी सी सी एल,चा ठेकेदार मजुरांसाठी मजुरी व सुविधा हायपॉवर कमेटीच्या शिफारसीनुसार लागू करण्यात आना सोबतच अन्य मान्यता शासनासमोर ठेवण्यात आना.हा तीन दिवसीय संप शंभर टक्के यशस्वी होणार असा विश्वास इंटक चे अध्यक्ष धनंजय गुंडावार,सचिव परमानंद चैबे,बी एम एस चे नाना महाकुलकर,विवेक फाळके,एच एम एस चे सुनिल श्रीवास्तव दत्ता कोंबे,आयटकचे दीपक ठोके,बंडू उपरे,महमूद खान,वीरेंद्र गौतम, व एस सी एस टी चे किशोरिअंक जानकी,सुधाकर इंगरकर,यांनी व्यक्त केली.

Previous articleदखलपात्र :- महाराष्ट्रात लॉक डाऊन च्या काळात भद्रावती-वरोरा येथे रेती चोरट्यांवर सर्वात मोठी कारवाई तर चंद्रपूर येथे नायब तहसीलदारावर हल्ला ?
Next articleकेंद्र सरकारच्या पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here