Home वरोरा सनसनिखेज:- दारूमाफिया बंडू उर्फ प्रशांत आंबटकर यांची वरोरा क्षेत्रात कोट्यावधीची दारू तस्करी...

सनसनिखेज:- दारूमाफिया बंडू उर्फ प्रशांत आंबटकर यांची वरोरा क्षेत्रात कोट्यावधीची दारू तस्करी ?

 

प्रभाकर च्या मदतीने अनिल सिंग उर्फ पिंटू जुनी यांचाही लाखों चा कारभार ? वरोरा पोलीस स्टेशन ची खास मेहबांनी ?

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा तालुका हा तसा शांत असला तरी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अवैध दारू आणल्या आणि विकल्या जात असून बंडू उर्फ प्रशांत आंबटकर ह्या दारू माफियाचा दरमहा कोट्यावधी रुपयाचा अवैध दारू साठा वरोरा येथे येत असल्याची सनसनिखेज माहिती समोर आली आहे आणि वरोरा पोलिस स्टेशन मधील अधिकारी यांना तो लाखोंचा हप्ता देत असल्याची सुद्धा चर्चा आहे. तुषार जयस्वाल व समीर जयस्वाल यांच्या कडून नागपूर वरून टी पी घेवून तो माल बुट्टीबोरीला उतरवील्या जातो व तिथून तो माल बंडू आंबटकर वरोरा येथे आपल्या छोट्या अवैध दारू व्यावसायिक यांना देत असल्याची माहिती असून चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा, चंदनखेडा, शेगाव माढेळी, नागरी, चिकणी, येथे अवैध दारूचा पुरवठा केला जात आहे, यामधे वरोरा शहरात बंटी बाहादे, राजू कातोरे, नावेद शेख, गुड्डू थैम, अमोल पाटील हे सर्व दारू चिल्लर भावात विकतात सोबतच माढेळी येथे महेश देवतळे, चंदन खेड्यात दिनेश माथनकर हे सर्व दारूचा धंदा करतात हे पोलिसांना माहीत असून सुद्धा पोलिस प्रशासनाची चुप्पी ही सर्व काही सांगून जात आहे. विशेष म्हणजे ठाणेदार पाटील यांचा पुतण्या म्हणून मिरविनाऱ्या प्रभाकर यांच्या मदतीने अनिल सिंह उर्फ पिंटू जुनी हा सुद्धा उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या कार्यालया समोरून अवैध दारू वाहतूक करीत असल्याची माहिती असून नुकताच त्यांचा अवैध दारू साठा सापडल्याने त्यांच्यावर वरोरा पोलिस स्टेशन मधे गुन्हे दाखल असल्याने तो फरार आहे मात्र तरीही दारूची अवैध विक्री काही नौकराच्या मदतीने शहरात तो आताही करीत असल्याने पोलिसांना हप्ता जात असल्याने तो निश्चिंत असल्याची माहिती आहे.

Previous articleलक्षवेधी :- पालकमंत्री साहेब, जनता कर्फ्यू नक्की करा, पण जिल्ह्यातील जनतेच्या आर्थिक संकटाला पण घालवा
Next articleधक्कादायक :- सत्तेचा दुरुपयोग करून कंचर्लावार कुटुंबियांची शहरात अनेक बेकायदेशीर अतिक्रमण व बांधकामे ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here