Home Breaking News दुर्दवी घटना :- भंडारा जिल्हा रुग्णालयात आग; १० नवजात बालकांचा मृत्यू,

दुर्दवी घटना :- भंडारा जिल्हा रुग्णालयात आग; १० नवजात बालकांचा मृत्यू,

 

७ जणांना वाचविण्यात यश,आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडून मृत्यू झालेल्या बालकांच्या कुटुंबीयांना तत्काळ मदत.

भंडारा प्रतिनिधी :-

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये (SNCU) आग लागल्यामुळे दहा नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. शनिवारच्या मध्यरात्री जवळपास दोन वाजताच्या सुमारात ही आग लागली. यात सतरा बालकांपैकी सात बालकांना वाचविण्यात यश आलेला आहे.

शनिवारी रात्रीच्या दरम्यान अचानक जिल्हा सामान्य रुग्णालयातील आऊट बोर्ण युनिटमधून धूर निघत असल्याचे समोर आले. ड्युटीवर असलेल्या नर्सने दार उघडून बघितले असता त्या रूममध्ये मोठ्या प्रमाणात धूर होता. त्यामुळे त्यांनी लगेच दवाखान्यातील अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर अग्निशमक दल घटनास्थळी पोहोचून दवाखान्यातील लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले मात्र दहा बालकांचा गुदमरून मृत्यू झाला तर सात बालकांना वाचविण्यात आरोग्य प्रशासनाला यश मिळाले आहे.

दरम्यान आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडून मृत्यू झालेल्या बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयाची आर्थिक मदत तत्काळ देण्याची घोषणा करण्यात आली.

Previous articleखळबळजनक :- हळद लागण्याच्या तीन दिवसापूर्वीच प्राध्यापक मुलीचा अपघातात दुर्दवी मृत्यू.
Next articleधक्कादायक :- नागपूर मधील कंपनीच्या नावावर वणी येथे दांडीया ब्रँड सुपारीची पैकिंग ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here