Home Breaking News धक्कादायक :- नागपूर मधील कंपनीच्या नावावर वणी येथे दांडीया ब्रँड सुपारीची पैकिंग...

धक्कादायक :- नागपूर मधील कंपनीच्या नावावर वणी येथे दांडीया ब्रँड सुपारीची पैकिंग ?

 

आलिशान बंगल्यात प्रतिबंधित ईगल जर्दा तंबाखूची पण पैकिंग? पोलिसांची कारवाई.

वणी प्रतिनिधी :-

महाराष्ट्रात प्रतिबंधक सुगंधीत तंबाखू खुलेआम विकल्या जात असून विविध नामांकित कंपन्यांच्या नावाखाली बनावट तंबाखू व सुपारीचा कारखाना सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी उघडकीस आला आहे. वणी पोलिसांनी शहरालगत चिखलगाव येथील महादेव नगरीत एका आलिशान बंगल्यात सुरु असलेल्या कारखान्यावर धाड टाकून कारखान्याचा चालक दीपक चावला यास अटक केली आहे.
घटनास्थळावरुन पाऊच पॅकिंग करण्याची ऑटोमॅटिक मशीन, मोठ्या संख्येने ब्रॅडेड कंपन्याचे पाऊच, पॅकिंग केलेले तंबाखू व सुपारीचे पाऊच, सुपारी भरलेले पोते व इतर साहित्य जप्त केले आहे.

दांडिया सुपारी कंपनीच्या नागपूर येथील अधिकाऱ्यांनी वणी येथे त्यांच्या कंपनीच्या नावावर बनावट पॅकिंग तयार होत असल्याची तक्रार नोंदवली होती. याबाबत पोलिसांना खात्रीशीर सूत्राकडून माहिती मिळाली की, महादेव नगरीत एका आलिशान घरात हा प्रकार सुरु असल्याच्या माहितीवरून ठाणेदार वैभव जाधव यांनी डीबी पथकासह दीपक चावला यांच्या बंगल्यावर धाड टाकली. त्यावेळी बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर मागील बाजूच्या खोलीत बनावट व प्रतिबंधीत ईगल जर्दा व दांडिया ब्रँड सुपारी तयार करण्याचे काम सुरु होते.

पोलिसांनी घटनास्थळावरून तब्बल 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केले. यावेळी तक्रारदार कंपनीचे अधिकारीही सोबत होते. पोलिसांनी आरोपीविरुद्ध अन्न व औषध मानके अधिनियमाच्या विविध कलमा तसेच शासनाची फसवणूक व कर चोरीच्या कायद्यांखाली गुन्हे दाखल केलेत.

Previous articleदुर्दवी घटना :- भंडारा जिल्हा रुग्णालयात आग; १० नवजात बालकांचा मृत्यू,
Next articleखळबळजनक :- शेतकऱ्यांचे दिल्ली येथील आंदोलन २०२४ पर्यंत चालण्याची शक्यता ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here