Home Breaking News अपघात :- मूल तालुक्यातील येरगाव रेती घाटावर ट्रक ड्रायव्हरचा मृत्यू.

अपघात :- मूल तालुक्यातील येरगाव रेती घाटावर ट्रक ड्रायव्हरचा मृत्यू.

 

अधिक रेती उपसा करण्याच्या नादात पहाटे रेती उपसा करणारा ड्रायव्हरला जेसीबीचा धक्का? .

मूल प्रतिनिधी :-

मूल तालुक्यातील येरगाव रेती घाटावर काम करणाऱ्या ट्रक ड्रायवर चा तोल गेल्याने आज सकाळी सहा वाजताचे दरम्यान अपघात होऊन मृत्यू झाल्याची घटना उजेडात आली आहे. मृत पावलेल्या ट्रक ड्रायव्हरचे नाव किशोर बबनराव मुनगेलवार (40) असून तो चंद्रपूर येथिल रहिवासी होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक किशोर मुनगेलवार हा ट्रक वरुन तोल जाऊन खाली पडल्याने जखमी झाला. प्रकृती गंभीर असल्याने त्याला मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती केल्यानंतर उपचारादरम्यान आज सकाळी साडेआठ वाजता त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. सध्या मूल तालुक्यातील रेती घाट सुरू झाले आहेत, खरं तर या रेती घाटावर सूर्योदयापूर्वी व सूर्यास्तानंतर रेती उपसा करता येत नाही. मात्र थेरगाव येथील या घाटातून दिवस-रात्र 24 तास रेतीचा उपसा करण्यात येतो आणि आज भल्या पहाटे झालेल्या अपघातावरूनही ही बाब स्पष्ट झाली आहे. रेती घाटावर सकाळी 6 वाजता ट्रक वरुन तोल जाऊन पडल्याने मृत्यू झाला असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात असले तरी, जेसीबीचा धक्का लागल्यानेच किशोर चा मृत्यू झाल्याची जोरदार चर्चा गावात दबक्या आवाजात सुरू होती. मात्र रेती वाहतुकीचा किशोर बळी ठरला असून पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here