Home वरोरा धक्कादायक :- अन्न पाण्याविना पोलिओग्रस्त मुलगा व आईचा दुर्दैवी मृत्यू.

धक्कादायक :- अन्न पाण्याविना पोलिओग्रस्त मुलगा व आईचा दुर्दैवी मृत्यू.

 

कोरोनाच्या काळात भुखमरीने मरणाऱ्यांची संख्या लक्षणीय असणार का?

लक्षवेधक :-

मागील एक वर्षापासून कोरोना प्रकोप सर्वसामान्य जनतेच्या जीवावर उठला असून मोलमजुरी करणाऱ्यांच्या हाताला काम नाही महागाई शिगेला पोहचली तर सरकार तर्फे कुठलीही ठोस मदत नाही अशातच लॉक डाऊन मुळे घराबाहेर सुद्धा पडता येत नाही तर मग मोलमजुरी करणाऱ्या माणसांनी जगायचं कसं हा यक्ष प्रश्न आहे आणि आता दोन वेळेच्या जेवणाची सोय नसल्याने गरीब लोकांना घरातच अन्न पाण्याविना मरावं लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

अशीच एक दुर्दवी घटना वरोरा शहरातील यात्रा वार्ड परिसरात घडली असून इथे राहणाऱ्या पोलिओग्रस्त 50 वर्षीय अंकुश जगदीश खोब्रागडे व 80 वर्षीय आई द्रौपताबाई जगदीश खोब्रागडे ह्या दोघांचा त्यांच्या राहत्या घरी अन्न पाण्याविना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

खोब्रागडे यांचं यात्रा वार्ड परिसरात स्वतःच घर आहे, मोठा मुलगा काही कामानिमित्त मुंबई येथे गेल्याने जगदीश व आई द्रौपताबाई यांच्यासाठी जेवणाची सोय जवळील मेस येथे मोठ्या मुलाने करून दिली होती. अंकुश हा जन्मजात पोलिओ ग्रस्त होता, त्यामुळे जगदीशची आई डबा घ्यायला जात असे मात्र काही दिवसांपासून द्रौपताबाई ह्या दुर्धर आजाराने ग्रस्त होत्या, 3 दिवसापासून द्रौपताबाई डबा घेण्यासाठी खानावळीत गेल्या नसल्याने काहींनी त्यांची चौकशी केली असता घरी दुर्गंधी येत आल्याने नागरिकांनी आत प्रवेश केला असता दोघे आई व मुलगा मृत अवस्थेत होते, त्यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता.

पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील चाचणीसाठी मृतदेह वरोरा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे, दोघांचा मृत्यू उपासमारीने झाला असेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत. अशा प्रकारच्या घटना येणाऱ्या काळात किती घडेल याचा नेम नसून कोरोना बीमारी पेक्षा उपासमारी यामुळे जास्त लोकांचा जीव जाण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here