Home भद्रावती प्रेरणादायी :- शिंदे परिवाराने स्वतःचे मंगल कार्यालय कोविड करिता दिल्यानंतर आता औषधी...

प्रेरणादायी :- शिंदे परिवाराने स्वतःचे मंगल कार्यालय कोविड करिता दिल्यानंतर आता औषधी सुद्धा दिली मोफत.

भद्रावती शिक्षण संस्था व शिंदे परिवाराच्या या संयुक्त दानशूरपणाची राजकारणी व लोकप्रतिनिधी प्रेरणा घेणार का?

विशेष बातमी :-

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतांना व रुग्णांना बेड मिळत नसतांना जिथे राजकारणी व लोकप्रतिनिधी केवळ बघ्यांची भूमिका घेत आहे तिथे भद्रावती येथील रविँदे शिंदे आणि परिवाराने स्वतःचे मंगल कार्यालय कोविड रुग्णांसाठी प्रशासनाला मोफत उपलब्ध करून तेथील रुग्णांना स्वतःकडून जेवण नाश्ता व स्वच्छ पाण्याची सुद्धा व्यवस्था केल्याने त्यांच्या कार्याची जिल्ह्यात जनतेने दखल घेतली आहे व त्यांचे भरभरून कौतुक केले आहे पण शिंदे परिवाराने एवढयाशा मदतीवर न थांबता कोरोना पॅाझिटीव्ह रुग्न ज्यांना घरीच विलगिकरणाची नियमाने परवानगी दिली गेली अशा रुग्नाना व ईतर आजार असलेल्याना व रिपोर्ट वरुन रुग्णांना हेल्पलाईन क्रमांक देऊन घरिच्याघरीं उपचार व मार्गदर्शन करण्याचे अभूतपूर्व कार्य सुरू केले आहे. त्यामुळे शिंदे परिवार कोरोना रुग्णांसाठी जणू देवदूत बनले असल्याची चर्चा सर्वदूर पसरली आहे.

भद्रावती तालुक्यातील एकमेव ग्रामीण रुग्णालय येथे आता औषधी चा तुटवडा असल्याने शिंदे मंगल कार्यालयातील कोरोना पॉझिटिव्ह गरीब रुग्णांना खाजगी रुग्णालयातून औषधी विकत घेण्याची वेळ आली आहे ही बाब जेंव्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष सिंह यांनी डॉ विवेक शिंदे आणि रवींद्र शिंदे यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी लगेच शिंदे परिवाराने औषधी तुटवडा भरून काढण्यासाठी नियमाने ग्रामीण रुग्णालय भद्रावती यांचे पत्र घेवुन चितामनी मेडिकल भद्रावती यांना देवुन पुरवठा करण्यात आला. मागणी पत्रानुसार टेबलेटच साठा उपलब्ध होताच पुरवण्यात येणार आहे. सोबतच गुलकोमीटर,बिपी चेक मिटर शिरफ सुद्धा पुरविले गेले आहे. यावेळी डॉ विवेक शिंदे व रवींद्र शिंदे यांनी आरोग्य अधिकारी मनीष सिंह व नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्याकडे हा साठा सुपूर्द केला.

भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती व शिंदे परिवार यांचा कोविड रुग्णांसाठीचा हा संयुक्त उपक्रम प्रेरणा देणारा आहे पण ही प्रेरणा राजकारणी व लोकप्रतिनिधी घेणार का? हा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे. कारण एकीकडे गोगरीब जनता रुग्णालयात बेड मिळत नाही ऑक्सिजन मिळत नाही व्हेंटिलेटर्स मिळत नाही म्हणून अम्बुलंस मधेच आपल्या नातेवाईक रुग्णांचा तडफडून जीव जातांना बघत आहे तर दुसरीकडे शिंदे परिवार अशा संकटाच्या काळात देवदूत बनून त्यांना मदत करीत असल्याने शिंदे परिवाराची ही आरोग्य सेवा चंद्रपूर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील अभूतपूर्व आरोग्य सेवा बनली आहे, अर्थात आतातरी लोकप्रतिनिधीनी ही प्रेरणा घेऊन येणाऱ्या कोरोना संकटात गोरगरीब रुग्णांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी होतं आहे.

Previous articleप्रेरणादायी :- शिंदे परिवाराने स्वतःचे मंगल कार्यालय कोविड करिता दिल्यानंतर आता औषधी सुद्धा दिली मोफत.
Next articleधक्कादायक :-पोलीस शिपाई प्रवीण रामटेके यांचा सत्कार तर ठाणेदार खोब्रागडे यांना फटकार?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here