ठाणेदार खोब्रागडे यांची दारू माफियांसोबत असलेली साठगांठ आली समोर, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी काढली खरडपट्टी?
पोलीस पंचनामा :-
वरोरा शहरातील चंद्रपूर महामार्गावर 22 लाखाची दारू पोलीस शिपाई प्रवीण रामटेके या एकट्या कर्तव्यदक्ष जिगरबाज पोलीस शिपायाने पकडल्या नंतर दारू माफियांसोबत असलेले ठाणेदार खोब्रागडे यांचे सबंध असल्याने त्यांनी पोलीस शिपाई प्रवीण रामटेके यांना धमकावून तू कां दारू पकडली? हा प्रश्न करून तुझी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करतो व तुझे सीआर खराब करतो अशी धमकी दिली असल्याची चर्चा आहे, एवढेच नव्हे तर कर्तबगार पोलीस शिपाई प्रवीण रामटेके यांच्यासोबत असहकार करण्याची ताकीद ठाणेदार यांनी बाकी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना देऊन प्रवीण रामटेके यांना एकटे पाडण्याचे पाप केले असल्याने वरोरा शहरातील जनतेने 22 लाखांची दारू पकडणाऱ्या पोलीस शिपाई प्रवीण रामटेके यांचा सत्कार केला आहे तर दारू माफियांचा साथ देऊन आपल्याच पोलीस शिपायाला शाबासकी देण्याऐवजी त्याला शिवीगाळ देऊन त्यांना धमकी देणाऱ्या ठाणेदार खोब्रागडे यांना वरोरा शहर वाशीयानी फटकार लावली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
वरोरा पोलीस स्टेशन मधे ठाणेदार दीपक खोब्रागडे यांची नियुक्ती झाल्यानंतर शहरातील शांतता सुव्यवस्था बिघडली असून अवैध धंदेवाईक व गुंड यांचा दबदबा वाढला आहे, शहरात खुलेआम जणू बियर बार खुलले की काय? अशी स्थिती निर्माण होऊन ठाणेदार खोब्रागडे यांनी लाखों रुपयांच्या हप्ता वसुली करिता अवैध धंदेवाईक यांना खुली सूट दिली आहे त्यामुळे त्यांचा आपल्या कर्मचाऱ्यांवर वचक नाही असे चित्र आहे, अशातच प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलीस शिपाई प्रवीण रामटेके यांनी जीव धोक्यात टाकून ,कोणत्याही दबावाला व आमिषाला बळी न पडता 22 लाखाची विदेशी दारू पकडून धडाकेबाज कामगिरी केली पण ठाणेदार खोब्रागडे यांना संबंधित दारू माफियांकडून लाखों रुपयांचा हप्ता येत असल्याने त्यांनी प्रवीण रामटेके यांच्यावर दबाव टाकून त्यांना धमकी दिली असल्याची माहिती आहे.या संदर्भात प्रसारमाध्यमांमधे बातम्या आल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक साळवे यांनी ठाणेदार खोब्रागडे यांची कानउघडणी केली असल्याची चर्चा आहे.
प्रवीण रामटेके या जॉबाज पोलीस शिपायाचा मनसे कडून सत्कार?
प्रवीण रामटेके यांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार पहाटे तीन च्या सुमारास हिंगणघाट कडून चंद्रपूर कडे जाणाऱ्या एका पिकअप मधून अवैधरित्या दारू वाहतूक होणार असल्याची माहिती मिळताच दोन पंचाना सोबत घेऊन आनंदवन चौक येथे त्यांनी गस्त लावली मात्र विना नंबर प्लेट ची ही पिकअप गाडी भरधाव वेगाने येत असताना चालकाला गाडी थांबविण्याचा इशारा केल्यानंतर सुद्धा चालकाने गाडी वेगात पळविली. पोलीस शिपाई प्रवीण रामटेके यांनी आपल्या चारचाकी वाहनाने पाठलाग करताच अंधारात गाडी सोडून पिकअप चालकाने पळ काढला. या पिकअप गाडीत 22 लाखांची दारू होती खरं तर ही फार मोठी कारवाई होती, पण ठाणेदार खोब्रागडे यांनी पोलीस शिपायाला ही दारूची गाडी सोडण्याचा आदेश दिला होता पण पोलीस शिपाई रामटेके यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता आपले कर्तव्य पार पाडून खाकी वर्दीचा सन्मान राखला त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका सचिव प्रशांत बदकी यांच्या नेत्रूत्वात प्रवीण रामटेके या इमानदार, कर्तव्यदक्ष ,जिगरबाज अशा पोलीस कर्मचारी यांच्या धाडसाचे कौतुक करून त्यांना पुन्हा ऊर्जा व बळ मिळावे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना वरोरा तर्फे शहिद योगेश डाहूले स्मारक येथ सत्कार करण्यात आला. यावेळी मनसे तालुका सचिव प्रशांत बदकी, मनसैनिक सचिन मांडवकर, प्रणय परिमल यांची उपस्थिती होती.महाराष्ट्र नवनिर्माण सेना वरोरा अश्या इमानदार पोलीसाच्या सदैव पाठीशी राहील अशी ग्वाही देत त्यांना पुढील कामगिरीसाठी शुभेच्छा देण्यात पण देण्यात आल्या.