बाळा नांदगावकर यांचा आदर्श इतर लोकप्रतिनिधी कधी घेणार?
विशेष बातमीपत्र :-
सद्ध्या महाराष्ट्रात कोरोना संक्रमनाची तीव्रता बघता सत्ताधारी नेत्यांच्या नियोजनाचे तीनतेरा वाजले असतानाच अनेक सामाजिक संघटना व ऊद्दोजक व्यापारी यांच्याकडून मोठी मदत होतं आहे, मात्र यामधे महत्वाचा घटक असलेल्या लोकप्रतिनिधी यांचा वाटा अतिशय शूक्लक असून काही लोकप्रतिनिधी तर आऊट ऑफ कव्हरेज आहेत. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना बेड नाही, ऑक्सिजन नाही, व्हेंटिलेटर्स नाही किंव्हा रेमडिसीव्हर इंजेक्शन नाही म्हणून कोरोना रुग्णांच्या नातेवाईक यांचा आक्रोश आहे तर दुसरीकडे ज्या जनतेच्या मतांवर खासदार, आमदार, नगरसेवक निवडून येतात त्यांचा हातभार व सहकार्य मिळत नसल्याने जनता त्यांच्या विरोधात आक्रोश व्यक्त करत आहे,असे असतांना सुद्धा कोरोना संकटात आपले योगदान देण्यासाठी मनसेचे नेते तथा माजी ग्रूहराज्यमंत्री बाळा नांदगावकर यांनी आपल्या एक महिन्याचे आमदारकीचे मानधन कोविड रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी मधे दिले आहे.
खासदार आमदार खूप होतात पण कुठलाही नेता लक्षात राहतो तो त्याच्या कामाने, कर्तृत्वाने, योगदानाने आणि निर्णयाने. व कामाने नेहमी लक्षात राहतो तोच खरा नेता आणि तोच समाजाचा खरा समाजसेवक असतो हे म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही. महाराष्ट्रात गेल्या २ महिन्यापासून कोवीडच्या महामारीने मोठ्या प्रमाणात हाहांकार माजविला असून गेल्या दीड ते दोन महिन्यात लोकांना आणि शासनालाही आर्थिक गोष्टींचा प्रचंड सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर एक जबाबदार लोकप्रतिनिधी माजी आमदार व माजी गृह राज्यमंत्री तसेच समाजाप्रती असलेली बांधिलकी म्हणून मला मिळणारे माहे एप्रिल २०२१ चे मासिक मानधन कोविड रुग्णाच्या खर्चासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी घेण्यात यावे असे पत्र मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले तसेच राज्यातील सर्व आजी माजी आमदार व खासदारांसह महाराष्ट्रातील सर्वच लोकप्रतिनिधींनी आपले स्वतःचे मासिक मानधन- वेतन हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस द्यावे, तसेच महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांनी देखील या कठीण काळात मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करावी असे आवाहन सुद्धा मनसे नेता बाळा नांदगावकर यांनी पत्राद्वारे सर्वांना केले आहे.
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी उर्वरित आजी माजी खासदार आमदार यांच्यापुढे आदर्श निर्माण करून महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही कायम महाराष्ट्रातील जनतेच्या दुःखात व संकटात सोबत असल्याची ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या उदार धोरणाचा आता किती लोकप्रतिनिधी फायदा घेतात आणि कोविड रुग्णांना किती मदत करतात हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार असून मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या या अभिनव कार्याची दखल सर्वत्र घेण्यात येत असल्याची माहीती आहे.