रवींद्र शिंदे यांच्या पुढाकाराने वरोरा भद्रावती येथे 200 -200 आटो चालकांना जीवनावश्यक वस्तूंच्या किट्स वाटप.
वरोरा प्रतिनिधी :–
कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे शहरात संपूर्ण आटोचालकांचे आटो मागील एक महिन्यापासून बंद आहे.त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असून त्यांच्या परीवारावर उपासमारीची पाळी आली असतांना व शासनाकडून कुठलीही आर्थिक मदत त्यांना मिळत नसतांना अशा कठीण परिस्थितीत मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक रवींद्रजी शिंदे यांनी वरोरा भद्रावती शहरातील ऑटो चालकांना जीवनावश्यक वस्तूंच्या किट्स वाटप केल्या त्यात वरोरा येथील 24 मे ला द्वारका नगरी येथील हनुमान मंदिर परिसरात त्यांनी 200 कीट्स 200 आटो चालकांना वाटप केले. तर भद्रावती येथील यशवंतराव शिंदे महाविदयालय येथे किट वाटप करण्यात आल्या.
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक रवीन्द्र शिंदे यांनी भद्रावती शिक्षण संस्था व शिंदे परिवाराकडून एक हात मदतीचा ही संकल्पना पुढे आणली. त्यांनी याच संकल्पनेच्या पार्श्वभूमीवर शिंदे मंगल कार्यालयात अत्याधुनिक कोविड सेंटर उभारून रविभाऊ शिंदे यांनी सामाजिक दायित्व जोपासत सामाजिक कार्याचा धडाका लावला आहे.
ते इथेच थांबले नाही तर गोरगरीब,सर्वसामान्य व्यवसायिकांचे कोरोनामुळे व्यवसाय ठप्प झाले आणि ज्या व्यासायिकांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली अशा स्थितीत जिथे शासन मदत करीत नाही तिथे त्यांनी वरोरा,भद्रावती तालुक्यातील ऑटो चालकांच्या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किट्स वाटप करण्याचा उपक्रम राबवून त्यांनी सामाजिक जबाबदारी घेतली. रवींद्र शिंदे यांनी जीवणावश्यक वस्तू, सोबतच मास्क, सॅनिटाइझर, पी.पी.ई किट्स व आवश्यक वस्तूंचा पुरवठा स्वतः आणून वाटप करतात. कुठलेही आमदार खासदार व पद नसतांना, राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मागील दोन महिन्यापासून गोरगरिब सर्वसामान्य जनतेला यथायोग्य मदत ते करीत असल्याने त्यांच्या या मदत कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
वरोरा शहरातील द्वारका नगरी येथील हनुमान मंदिरात आटो चालकांना रविभाऊ शिंदे यांनी जीवनावश्यक वस्तूंच्या किट्स वाटप करतांना आटो चालकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. सर्वसामान्य जनतेची काळजी घेणारा सच्चा सामाजिक कार्यकर्ता म्हणून रवींद्र शिंदे यांच्याकडे बघितल्या जाते. वरोरा येथे जीवनावश्यक वस्तूंच्या किट्स वाटप प्रसंगी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान संचालक रविजी शिंदे,वसंता मानकर, सामाजिक कार्यकर्ते दत्ताभाऊ बोरेकर,सूरज निब्रड, पत्रकार बाळूभाऊ भोयर,राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते जयंत टेमुर्डे,नगराध्यक्ष अहेतेशाम अली,पवन महाडिक,आशु राऊत,संजय नरोले,गोपाल राजपूत,त्रिशूल घाटे,राम टोंगे,शुभम निखाते, दिगंबर लडके, सुरेश कामडी,मोरे गुरुजी,सुधाकर वरभे,वैभव डहाणे,प्रमोद बोरा,राजू बगडे,यांची प्रमुख उपस्थिती होती. तथा आटो संघटनेचे अध्यक्ष अरविंद तिखट,उपाध्यक्ष प्रमोद धोपटे, सचिव मधुकर राऊत,कोषाध्यक्ष बाबा खंडाळकर,सल्लागार समितीचे विलास खापणे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.तर भद्रावती येथे रवींद्र शिंदे डॉ. विवेक शिंदे, यांच्यासह बाळा उपलेंचवार,वसंता मानकर, हर्षल शिंदे.डॉ जयंत वानखेडे,प्रा. रमेश चव्हाण,प्रा. राजेंद्र साबळे,तेजस कुंभारे,ऑटो चालक संघटना भद्रावती चे अध्यक्ष कल्याण मंडल,उपाध्यक्ष विनोद कुमरे,सचिव कैलास साखरकर.कोषाध्यक्ष दिनेश बदखल.