Home वरोरा वरोरा येथील कोरोना ग्रस्तांना साई वर्धा कंपनीचा मदतीचा हात.

वरोरा येथील कोरोना ग्रस्तांना साई वर्धा कंपनीचा मदतीचा हात.

 

कंपनीने 6 संगणक आणि 6 डाटा एन्ट्री ऑपरेटर सुद्धा आरोग्य सेवेसाठी प्रशासनाला दिले.

वरोरा तालुका प्रतिनिधी–

कोरोनाच्या काळात अनेकांचे रोजगार गेले तर काहींना दोन वेळेसचे अन्न कसे मिळेल याची विवंचना लागली असताना वरोरा येथील औद्योगिक वसाहतीतील साई वर्धा पॉवर जनरेशन कंपनी च्या वतीने प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष 1500 जनांना रोजगार आणि कोविंड ग्रस्तांना दिलेला मदतीचा हात दिला असून प्रशंसनीय ठरला आहे.

त्याचप्रमाणे वरोरा शहरातील माता महाकाली कोविंड केंद्रात कंपनीच्या वतीने रुग्णांना दररोज चहा-नाश्ता आणि भोजन पुरविले जात आहे. तसेच . शासकीय आरोग्य कर्मचाऱ्यांकरिता कंपनीच्या वतीने 500 फेस शिल्ड आणि मास्क चे सुद्धा वाटप करण्यात आले. शहरातील लसीकरण केंद्राकरिता कंपनीच्या वतीने 6 संगणक आणि 6 डाटा एन्ट्री ऑपरेटर मदतीसाठी देण्यात आलेले आहे.

कोरोना काळात कंपनी परिसरातील आठ ग्रामपंचायती आणि वरोरा नगरपरिषद क्षेत्रातील लोकांना मास्क, सानिटायझर आणि सोडियम हायड्रॉक्साइड चे वितरण सुद्धा करण्यात आले . शहरातील विलगीकरण कक्षात असलेल्या 100 व्यक्तींना दररोज नाश्ता पुरविला जात होता. तालुक्यातील गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कंपनीतर्फे करण्यात आला असून अहिल्याबाई होळकर वृद्धाश्रमाला गहू, तांदूळ, तूर डाळ, साखर आणि तेलाचे वितरण करण्यात आले . विशेष म्हणजे कंपनीच्या सी एस आर विभागांतर्गत कंपनीचे वैद्यकीय अधिकारी ग्रामीण भागात जाऊन कोविंड रुग्णांना सेवा देत आहेत. कंपनीने घेतलेल्या या पुढाकाराचे सर्वत्र स्वागत होत असून यापुढेही गरजूंना मदत करण्याचे आश्वासन कंपनीचे हेड नॉन टेक्निकल आणि लाईझनिंग ज्ञानेश माटे यांनी सांगितले. मुख्य प्रबंधक दिलीप जोशी यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ व्यवस्थापक मुकेश ओवे आणि त्यांची चमू या करता परिश्रम घेत आहे.

Previous articleधक्कादायक :- लसीच्या तुटवड्याला केंद्रातील मोदी सरकारच जबाबदार?
Next articleदुर्लक्षित ऑटो चालकांच्या मदतीला भद्रावती शिक्षण संस्था व शिंदे परिवाराकडून एक हात मदतीचा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here