Home वरोरा आरोग्य :- दहेगाव येथे लसीकरनाला उत्स्फूर्त प्रतिसाद, तब्बल 158 नागरिकांनी घेतले डोज.

आरोग्य :- दहेगाव येथे लसीकरनाला उत्स्फूर्त प्रतिसाद, तब्बल 158 नागरिकांनी घेतले डोज.

 

इंटरनेटच्या डाऊन सर्वरमुळे लिंक ओपन होत नसल्याने उरलेल्या नागरिकांना लवकरच मिळणार लस.

वरोरा प्रतिनिधी :-

आता गाव खेड्यावर कोविड लसीकरण मोहीम जोरात सुरू असून दिनांक 07/06/2021 रोज सोमवार ला कोविड 19 ची लसीकरण मोहीम दहेगांव येथील प्राथमिक शाळेत ठेवण्यात आली होती. सकाळी 10 वाजता या लसीकरण मोहिमेचे उदघाटन सरपंच विशाल नानाजी पारखी यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ग्रामपंचायत सचिव टी.एम. लांजेवार, आरोग्य विभागाच्या डॉक्टर प्रतिभाताई शिंदे ,कायरकर, जी. डी. उरकुडे ,एस ए संतोषवार ,जयश्री रामटेके आरोग्य सेविका ग्रामपंचायत दहेगांव चे शिपाई गजानन कडुकर ,अंगणवाडी सेविका सुचिता बोडे, जनाबाई सोनटक्के ,आशा वर्कर टाले उपस्थित होते.

या लसीकरणाची सुरवात 82 वर्षीय गोदाबाई उपरे व 80 वर्षीय नानाजी झाडे यांना लस देऊन करण्यात आली, वयोवृद्ध व्यक्तीनी लस घेऊन दहेगांव मधील लोकांना लस घेण्यासाठी आव्हान केले व एक उत्साह निर्माण केला, हे लसीकरण सकाळी 10 वाजता चालू होऊन सायंकाळी 5 वाजून 30 मिनिटाला संपले एकूण 158 लोकांना लसीकरण झाले व लिंक गेल्यामुळे जवळपास 7 व्यक्ती ना लसीकरण करता आले नाही पण लवकरच उर्वरित नागरिकांना लस देण्यात येणार असल्याची माहिती असून लसीकरण मोहिमेत त्यांना कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून सागर चिंचोलकर यांनी मदत केली तसेच ,गावातील तरुणांनी सुद्धा या लसीकरणाला मदत केली, गावात ग्रामपंचायतने लसीकरनाआधी केलेल्या जनजागृती मुळे जनतेनी उत्स्फुर्त पणे साथ दिली व सकारात्मक दृष्टिकोन दाखवून लसीकरनाला दहेगांव वासीयांनी सहकार्य केले त्याबद्दल सरपंच विशाल पारखी यांनी गावकऱ्यांचे आभार मानले. गाव सुदृढ, सशक्त व निरोगी रहावा यासाठी ग्रामपंचायत दहेगांव नेहमीच जनहितार्थ अग्रेसर राहत असल्याची ग्वाही पण त्यानी दिली,

Previous articleभद्रावतीत १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग.
Next articleकृषी वार्ता :- खाबांडा परिसरात कृषी संजीवनी सप्ताह निमीत्ताने शेतकरी कार्यशाळा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here