Home वरोरा कृषी वार्ता :- खाबांडा परिसरात कृषी संजीवनी सप्ताह निमीत्ताने शेतकरी कार्यशाळा.

कृषी वार्ता :- खाबांडा परिसरात कृषी संजीवनी सप्ताह निमीत्ताने शेतकरी कार्यशाळा.

गावातील शेतकऱ्यांनी घेतला उत्स्फूर्त सहभाग.

खाबांडा
मनोहर खिरटकर:-

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वंसतराव नाईक यांनी कृषी विभागात केलेली भरीव कामगिरी लक्षात घेऊन संपूर्ण राज्यात एक जुलै ते सात जुलै या दिवसात कृषी संजीवनी सप्ताह साजरा केला जातो. पंरतु या वर्षी लवकरच एक जुन पासून सप्ताह करण्याचे कृषी विभागाला आदेश देण्यात आले. त्यामुळे खाबांडा परिसरात कृषी विभागामार्फत सप्ताह साजरा करताना तालुक्यातील प्रत्येक गावात भेटी देऊन शेतकरी आर्थिकदृष्ट्या संपन्न व्हावा यासाठी कृषी तंत्रज्ञान मिळणे गरजेचे आहे, म्हणून वरोरा तालुक्यातील फत्तापुर येथे शेतीशाळा घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना कृषी अधिकारी दिपक चवरे यांनी बिज प्रक्रिया करने ,बिज उगवन क्षमता तपासणी, बोंडअळी, लष्करी अळी याचा नायनाट कसा करावा, तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, सिंचन योजना, जमीन आरोग्य पत्रिका, कापुस पिकांची लागवड व व्वस्थापन, सोयाबीन वरील खोडकिडी, मररोग,,आंतरपिकांचे संगोपन व खतव्यवस्थापन आदि विषयावर उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले यावेळी गावातील शेतकरी मारोती आसुटकर, नानाजी ठाकरे, लक्ष्मण वायदुळे ,महेश वायदुळे, राजु डुमरे,खुशाल आसुटकर,,विलास वायदुळे, रूशी ठाकरे, नानाजी खानेकर आदि शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here