Home वरोरा मनसे नेते रमेश राजूरकर यांच्या नेतृत्वात मनसेचा जीएमआर कंपनी विरोधात एल्गार.

मनसे नेते रमेश राजूरकर यांच्या नेतृत्वात मनसेचा जीएमआर कंपनी विरोधात एल्गार.

 

तहसील कार्यालयासमोरील एक दिवसीय धरणे आंदोलनातून कंपनी व्यवस्थापन विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी.

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा तालुक्यातील जीएमआर कंपनीमधे परप्रांतात कामगार कोरोना पॉझिटिव्ह निघल्याने तालुक्यातील जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या या कंपनी व्यवस्थापनावर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीला घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते रमेश राजूरकर यांच्या नेतृत्वात मनसेचे एक दिवशीय धरणे आंदोलन वरोरा तहसील कार्यालयासमोर घेण्यात आले.

एकीकडे जीएमआर कंपनी मधे स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगार मिळत नाही पण परप्रांतीय कामगारांना इथे मोठ्या प्रमाणात नोकऱ्या मिळतात याकडे स्थानिक प्रशासन व राजकीय मंडळी कडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे असे असतांना आता परप्रांतीय कामगारांची कुठलीही वैद्यकीय तपासणी व पोलीस वेरिफिकेशन न करता जिल्ह्यातील उद्दोगात कामगारांना कामावर घेतल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार जीएमआर कंपनीकडून समोर आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्याकडे तक्रार करून परप्रांतीय कामगारांना कोरोना टेस्ट न करता वरोरा तालुक्यातील जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कंपनी विरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली होती. पण सात ते आठ दिवस लोटल्या नंतर सुद्धा प्रशासनाने गुन्हे दाखल केले नाही तर उलट जीएमआर कंपनीला क्लीनचीट देण्यात आली.

एकदिवसीय धरणे आंदोलनानंतर उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांना निवेदन देऊन जीएमआर कंपनी वर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करा व या कंपनीतील सर्व कामगार कर्मचाऱ्याचे पोलीस वेरिफिकेशन करून परप्रांतीय कामगार इथे किती आहे त्याचा आकडा घेऊन शासनाच्या स्थानिक ८० टक्के बेरोजगार युवकांना कामावर घेण्याचा कायदा अमलात आना अशी मागणी करण्यात आली. यावेळी मनसेचे नेते रमेश राजूरकर यांच्यासह मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे. जिल्हा सचिव विनोद सोनटक्के,तालुका अध्यक्ष वैभव डहाने,जगदीश लांडगे, तालुका सचिव कल्पक ढोरे,तालुका उपाध्यक्ष प्रशांत बदकी, शहर अध्यक्ष राहुल लोणारे, शहर उपाध्यक्ष कुणाल गौरकार,अजिंक्य नरडे,मनविसे जिल्हा उपाध्यक्ष मुज्जमील शेख,तालुका अध्यक्ष अभिजित अष्टकार,तालुका उपाध्यक्ष शुभम कोहपरे, सचिन मांडवकर, शहर अध्यक्ष अनिकेत पुरी,धीरज गायकवाड, प्रितम ठाकरे, हर्षद घोडीले(शहर संगटक) विक्की येरने  (तालुका प्रसिद्धी प्रमुख)आशिष मित्तपल्लीवर पवन उपरे,चेतन निकोडे, विजय खारकर, बाळू गेडाम राजेंद्र धाबेकर, राजूनवघरे इत्यादींची उपस्थिती होती.

Previous articleअजब गजब :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चंद्रपूर विभागात सावळा गोंधळ ?
Next articleखळबळजनक :- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नाशिक मधून होणार अटक?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here