Home वरोरा दुर्दवी घटना :- शेतकऱ्याच्या गोठ्याला आग लागून शेतीच्या साहित्यासह गाई आणि म्हशी...

दुर्दवी घटना :- शेतकऱ्याच्या गोठ्याला आग लागून शेतीच्या साहित्यासह गाई आणि म्हशी ठार.

 

भालचंद्र गारघाटे शेतकऱ्याचे जवळपास ८ ते ९ लाखांचे नुकसान. प्रशासन नुकसान देईल का?

वरोरा प्रतिनिधी :-

देव देतो आणि तक़दीर नेत असे म्हणतात ते शेतकऱ्यांना शंभर टक्के लागू होत असून वरोरा तालुक्यातील जळका या गावातील भालचंद्र शंकर गारघाटे यांच्या घराजवळ असलेल्या बैल गोठ्याला आग लागल्याने शेती व्यवसायासाठी लागणारे साहित्यासह आठ जनावरे जळून खाक झाल्याने गावात सर्वत्र दुःख व्यक्त होत आहे.

भालचंद्र शंकर गारघाटे या शेतकऱ्याकडे पाच एकर जमीन असून शेती व्यवसायासाठी लागणारे साहित्य ठेवण्यासाठी हा गोठा तयार केला होता. या गोठ्यामध्ये 3 गाई 2 बैल 2 गोरे,1 लहान कालवड बांधल्या जात होत्या सोबतच इतर शेतीचे साहित्य स्प्रिंकलर पाईप, खताच्या तीस थैल्या, विहिरीची मोटार, शेती उपयोगी अवजारे या गोठ्यात ठेवण्यात आली होती. असे एकूण जवळपास आठ ते नऊ लाखाचे नुकसान या शेतकऱ्याचे झाले आहे. ही आग कशामुळे लागली याचे कारण अस्पष्ट असून या आगीत सर्व जनावरे जळून खाक झाली आहेत तर महत्त्वाच्या हंगामात शेतीचे एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्याचे फार मोठे नुकसान झाले आहे.
त्यामुळे संबंधित विभागाने व सामाजिक संस्थेने त्वरित शेतकऱ्याची मदत करण्याची मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here