Home वरोरा आरोग्य :- वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालय काळोखात? आरोग्य प्रशासनाचे तीनतेरा वाजले.

आरोग्य :- वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालय काळोखात? आरोग्य प्रशासनाचे तीनतेरा वाजले.

 

महाराष्ट्र सैनिकांनी घेतली दाखल ही समस्या त्वरित निकालात काढण्याची केली मागणी.

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात कोणत्याही आरोग्य सुविधा नसल्याने येथील रुग्णांचे चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात स्थानांतरण करतात मग जिल्ह्याचे उपजिल्हा रुग्णालय म्हणून मिरवीण्यात काय अर्थ आहे? असा प्रश्न वरोरा तालुक्यातील रुग्णांच्या नातेवाईकांना वाटत आहे याहून कहर म्हणजे या उपजिल्हा रुग्णालयात रात्रीला लाईट गेल्यावर जनरेटर व इन्व्हेटर नसल्याने रुग्णालय काळोखात गडद झाल्यासारखे वाटत असते. याचा प्रत्यय महाराष्ट्र सैनिक आनंद गेडाम यांना दिनांक 27 सप्टेंबरच्या रात्री झाल्यानंतर त्यांनी तात्काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांना संपर्क केला पण त्यानंतर काही वेळाने अर्ध्या भागात जनरेटर चालू करून लाईट आणली गेली तरीही काही भाग जिथे रुग्ण उपचार घेत होते तिथे अंधारच होता दरम्यान काही अनुचित प्रकार घडला तर जबाबदार कोण राहील? हा सवाल करून महाराष्ट्र सैनिक आनंद गेडाम यांनी आपल्या महाराष्ट्र सैनिकांना घेऊन उपजिल्हा रूग्णालयाचे अधिकारी यांना निवेदन दिले व ही समस्या त्वरित सोडवा अन्यथा मनसे तर्फे खळखट्ट्याक आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला.

उपजिल्हा रुग्णालय हे मागील अनेक वर्षापासून समस्यांच्या विळख्यात आहे, इथे आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजले असून इथे सीटी स्कैन मशीन नाही ब्लड देण्याची व्यवस्था नाही कारण ब्लड बैंकच नाही. सोनोग्राफी मशीन नाही त्यामुळे इथे भरती झालेल्या रुग्णांना सरळ चंद्रपूर च्या जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवल्या जाते त्यामुळे गंभीर असलेला रुग्ण मधातच दम तोडतो अर्थात याकडे लोकप्रतिनिधी यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष म्हणावे की वरोरा शहरातील जनतेची हे सगळ सहन करण्याची सहनशक्ती म्हणावे हेच कळायला मार्ग नसून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेल्या खळखट्ट्याक आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचे काही जाणकारांचे मत आहे, आता या समस्यांना आरोग्य विभाग किती गंभीरपणे घेईल हे येणार काळच ठरविणार आहे.

Previous articleसंतापजनक :- वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी लाच मागणारा डॉ. शेख एसीबी जाळ्यात.
Next articleगौरव :- प्रवीण सुराणा यांनी वरोरा शहरात सामाजिक कार्याचा रचला कळस.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here