Home वरोरा गौरव :- प्रवीण सुराणा यांनी वरोरा शहरात सामाजिक कार्याचा रचला कळस.

गौरव :- प्रवीण सुराणा यांनी वरोरा शहरात सामाजिक कार्याचा रचला कळस.

 

गांधी उद्यान योग मंडळ ऑक्सिजन ब्रिगेड व स्वर्गरथ सेवेबद्दल त्यांचा झाला गौरव.

वरोरा :-

वरोरा शहरात खरं तर सामाजिक कार्यात अनेक कार्यकर्त्यानी आपले सर्वोच्य योगदान देऊन वरोरा शहरातील जनतेचे लक्ष वेळोवेळी वेधले आहे पण त्यात सामाजिक कार्यानी झपाटलेले प्रवीण सुराणा यांनी त्यांच्या सचिन,नितेश ,मनोज,जयंत प्रमोद, शैलेश व नरेंद्र या साथीदारांना घेऊन जे सामाजिक दायित्व निर्माण केले ते वरोरा शहराच्या सामाजिक कार्याचा एक प्रकारे कळस आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये एवढे अलौकिक कार्य कोरोना महामारीच्या काळात त्यांनी केले आहे. कुणाचा वाढदिवस असो की कुणी यश संपादन केले असो प्रवीण सुराणा आणि त्यांची चमू ही तिथे पोहचली म्हणून समजा एवढे जागरूक आणि सजग कार्य करणारे प्रवीण सुराणा यांनी अनेकांना मदतीचा हात दिला आहे.

त्यांच्या या कार्याची दखल घेऊन देशाचे ख्यातनाम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला त्यामुळे प्रवीण सुराणा यांनी आपल्या सामाजिक कार्याने वरोरा शहरात एक नवी सामाजिक क्रांती निर्माण केल्याची चर्चा जनसामान्यांत होत आहे.

Previous articleआरोग्य :- वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालय काळोखात? आरोग्य प्रशासनाचे तीनतेरा वाजले.
Next articleअत्यंत चिंताजनक :- एका सराईत गुन्हेगारानं चाकूचा धाक दाखवून दोन तास केला अत्याचार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here