Home वरोरा सीडीसीसी बैंकच्या प्रेरणेने आता वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीही शेतकऱ्यांच्या मदतीला?

सीडीसीसी बैंकच्या प्रेरणेने आता वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीही शेतकऱ्यांच्या मदतीला?

 

कोटबाळा येथील शेतकऱ्याच्या आकस्मिक मृत्यु प्रकरणी  कुटुंबीयांना केली मदत.

वरोरा प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकैचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक रवींद्र शिंदे यांच्या माध्यमातून वरोरा भद्रावती तालुक्यातील नुकसानग्रस्त शेत पिकांसाठी व आकस्मिक मृत्यु किव्हा वाघांच्या डुकराच्या हल्ल्यात जखमी व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना या संदर्भात तात्काळ मदत देण्याचा उपक्रम त्यांनी राबवून शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे केला आहे. त्याच धर्तीवर व त्यांचीच प्रेरणा घेऊन आता वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती तर्फे सुद्धा नवा उपक्रम सुरू झाला असून नुकताच कोटबाला येथील शेतकरी हेमंत भास्कर उरकांडे यांचा शेतात काम करीत असताना वीज पडून दुर्दवी मृत्यु झाला असल्याने त्यांना वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती तर्फे 15 हजार रुपयाची आर्थिक मदत चेक द्वारे देण्यात आली आहे.

कोटबाळा येथील हेमंत भास्कर उरकांडे यांचा शेतात काम करीत असताना वीज पडून दुर्दवी मृत्यु झाला हि बाब कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक हरीश जाधव यांना माहित झाली. त्यानी झालेली ही घटना बाजार समिती सभापती यांच्या कडे फोन वरून दिली. आणि लगेच आज दि 03/10/21 रोज रविवारला कृउबासची वरोरा ची टीम दुपारी 2:00 च्या सुमारास येऊन आर्थिक मदतीचा धनादेश देऊन त्या कुटुंबातील पत्नी वर मुलाला धीर दिला, याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजेंद्र चिकटे कृषी उत्पन्न बाजार समिती उप सभापती देवानंद मोरे, हरीश जाधव, संजय घागी, योगेश खामनकर, बंडू शेळकी, तसेच काही कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचारी सचिव चंद्रसेन शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समिती उप सचिव सचिन डहाळकर आणि लिपिक श्रीकांत ताटेवार आणी गावातील पोलीस पाटील दिपक निब्रड, ग्राम प सदस्य रोशन खोंडे तसेच प्रहार शेतकरी संघटना माजी तालुका अध्यक्ष किशोर डुकरे, पत्रकार गोपाल निब्रड उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here