Home राजकारण खळबळजनक :- उपसरपंचाच्या जाचाला कंटाळून ग्रामसेवकाने केली आत्महत्या.

खळबळजनक :- उपसरपंचाच्या जाचाला कंटाळून ग्रामसेवकाने केली आत्महत्या.

 

धबधब्यावरुन उडी घेऊन संपवली जीवनयात्रा.

नेटवर्क न्यूज :-

ग्रामपंचायत चा कारभार पाहणाऱ्या ग्रामसेवक व सरपंच उपसरपंच यांचा समन्वय असणे जरूरी असते पण आर्थिक देवाणघेवाण बिघडली की त्यात तक्रारी सुरू होतात असाच एक प्रकार समोर आला असून 24 सप्टेंबर रोजी आत्महत्या करणाऱ्या ग्रामसेवक झुंबर मुरलीधर गवांदे यांच्या आत्महत्तेचे कारण समोर आल्याने एकच खळबळजनक उडाली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात ही घटना घडली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील खांडगाव – वडघुल या गट ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक झुंबर मुरलीधर गवांदे यांनी सौताडा धबधब्यावरुन उडी घेऊन 24 सप्टेंबर रोजी आत्महत्या केली होती. या प्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ज्या ठिकाणी ग्रामसेवक झुंबर मुरलीधर गवांदे यांनी आत्महत्या केली होती त्या धबधब्यावरील घटनास्थळी गवांदे यांची बॅग, आयकार्ड, मोटरसायकल मिळाली होती मात्र आठ दिवसांपासून मृतदेहाचा शोध सुरू होता. आठ दिवसांनी आढळला आत्महत्या केलेल्या ग्रामसेवकाचा मृतदेह आढळून आला. काल दुपारी त्यांची बॉडी सापडली होती या प्रकरणी बीड तालुक्यातील सौंदांडा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. मात्र खांडगाव – वडघुलचे उपसरपंच राम घोडके यांच्या त्रासला कंटाळून गवांदे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप होत असून दोषींवर कारवाईचे करण्याची मागणी मयताच्या पत्नीने केली आहे.

या प्रकरणातील उपसरपंच राम घोडके आणि ग्रामसेवक झुंबर गवांदे यांच्या संभाषणाच्या रेकॉर्डिंग व्हायरल झाल्या आहेत. व्हायरल झालेल्या या रेकॉर्डिंगमध्ये गावातील फॉरेस्ट हद्दीत असलेल्या दिडशे घरांची नियमबाह्य नोंद लावण्यासाठी उपसरपंच राम घोडके यांच्याकडून ग्रामसेवक झुंबर गवांदे यांच्यावर दबाव टाकण्यात येत होता. यासोबतच त्यांची इतरही काही कामे घोडके यांनी सांगितले होती. ती करण्यासाठी उपसरपंच राम घोडके हे दबाव टाकत होते.

ग्रामसेवक झुंबर गवांदे यांच्या विरोधात उपसरपंच रामा घोडके यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली होती. तक्रर मागे घ्यायची असेल तर ही कामे करा असे संभाषण आहे. या घटनेने संपूर्ण नगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणी पोलीस नेमकी काय कारवाई करतात हे पहावं लागेल.

Previous articleसीडीसीसी बैंकच्या प्रेरणेने आता वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीही शेतकऱ्यांच्या मदतीला?
Next articleआरोग्य वार्ता :- लसूण ५ पाकळ्या अश्या खा, हार्ट अटॅक आयुष्यात येणार नाही,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here