Home राष्ट्रीय खळबळजनक :- पेट्रोलियम राज्यमंत्री रामेश्वर तेली यांच्या पेट्रोल डिझेल दरवाढीच्या वक्तव्याने उडाली...

खळबळजनक :- पेट्रोलियम राज्यमंत्री रामेश्वर तेली यांच्या पेट्रोल डिझेल दरवाढीच्या वक्तव्याने उडाली खळबळ.

 

पेट्रोल डिझेल का वाढविण्यात आले? हे ऐकून कुणालाही येणार संताप?

न्यूज नेटवर्क :-

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरावर संपूर्ण देशात संतापाची लाट असताना आता त्यात पेट्रोलियम राज्यमंत्री रामेश्वर तेली यांच्या वक्तव्याने पुन्हा भडका उडण्याची शक्यता आहे. कारण करोनावरील लस मोफत देण्यात आली आहे आणि यासाठी पैसे कुठून येणार? तुम्ही मोफत लसीसाठी पैसे दिले नाहीत. यामुळे लसीसाठीचा निधी असाच गोळा केला गेला, असं पेट्रोलियम राज्यमंत्री रामेश्वर तेली प्रसारमाध्यमाना प्रतिक्रिया देताना म्हणाले.

खरं तर मोदी सरकारने देशातील जनतेला एवढे जर्जर केले की त्यांनी जगावे की मारावे हेच कळत नाही कारण अच्छे दिन च्या नावाखाली त्यांनी एवढे वाईट दिवस आणले की की एकीकडे कर्जबाजारीपणामुळे शेतकरी यांच्यासह छोटे व्यापारी छोटे ऊद्दोजक गळ्याला फास आवळत आहे तर दुसरीकडे महागाई मोठ्या प्रमाणात वाढल्याने सर्वसामान्य जनतेचे आर्थिक बजेट बिघडले आहेत. पेट्रोल डिझेल चे भाव वाढल्याने महागाई पुन्हा वाढली पण मोदी सरकारला याचे काहीही सोयरसूतक नाही अशी लक्षणे दिसत आहे त्यातच देशातील जनतेला दिल्या जाणाऱ्या कोरोना लसीकरणासाठी पेट्रोल डिझेल च्या किंमतीत वाढ करण्यात आल्याचे निर्लज्ज वक्तव्य पेट्रोलियम मंत्री रामेश्वर तेली यांनी आसाम येथे प्रसारमाध्यमाना प्रतिक्रिया देताना व्यक्त केल्याने देशात यामुळे खळबळ उडाली आहे.

काय म्हणाले पेट्रोलियम मंत्री?

इंधनाचे दर अधिक नाहीत. त्यात कराचाही समावेश आहे. तुम्ही मोफत लस घेतलीच असेल. पण यासाठी पैसा कुठून येणार? तुम्ही पैसे दिले नाहीत, यामुळे त्यासाठी अशाच प्रकारे निधी जमा केला गेला, असं केंद्रीय मंत्री रामेश्वर तेली म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here