Home वरोरा अन प्रहार अध्यक्ष बच्चू कडू यांचे वरोरा तालुक्यातील भिडू किशोर डुकरे बनले...

अन प्रहार अध्यक्ष बच्चू कडू यांचे वरोरा तालुक्यातील भिडू किशोर डुकरे बनले तंटामुक्ती अध्यक्ष.

 

जिल्हा परिषद बांधकाम सभापती यांच्या आसाळा गावात प्रहार सेवक किशोर डुकरे यानी मारली बाजी.

वरोरा प्रतिनिधी :-

प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रहारसेवक किशोर डुकरे यानी त्यांच्या”आसाळा” या गावी झालेल्या तंटामुक्ती अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत 6-4 अशा फरकाने बाजी मारली असून त्यांच्या विजयाने वरोरा तालुक्यात प्रहार जनशक्ती पक्षाची ताकत उभी राहताना दिसत आहे. जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती राजू गायकवाड यांच्या गावात किशोर डुकरे यांनी मिळविलेल्या विजयाने वरोरा तालुक्यातील प्रहार सेवकांनी एकच जल्लोष केला असून येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा प्रहार जनशक्ती पक्ष मजबूत होणार असा आशावाद व्यक्त केल्या जात आहे.

महाराष्ट्रात बच्चू कडू यांची जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलनाची जी स्टाईल आहे ती विख्यात असून त्यांचे कार्यकर्ते पण अगदी त्याच स्टाईलने आंदोलन करतात आणि प्रशासनाला झूकवून जनतेला न्याय मिळवून देतात.असाच एक बच्चू कडू यांचा वरोरा तालुक्यातील भिडू म्हणजे किशोर डुकरे ज्यानी वरोरा तालुक्यात अनेक आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले आणि सर्वसामान्य जनता व विशेष करून शेतकऱ्याना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. नुकतेच त्यांचे तहसील कार्यालयाच्या झाडावर चढून केलेले वीरुगीरी आंदोलन खूप गाजले व त्याची दखल टीवी चैनेल पासून तर सर्व प्रसारमाध्यमानी घेतली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here