Home वरोरा ब्रेकिंग न्यूज :- आमदार चषक कबड्डी सामन्यादरम्यान प्रेक्षकांची गैलरी कोसळून कित्तेक प्रेक्षक...

ब्रेकिंग न्यूज :- आमदार चषक कबड्डी सामन्यादरम्यान प्रेक्षकांची गैलरी कोसळून कित्तेक प्रेक्षक जखमी.

वरोरा येथील घटना, एकाची प्रकृती गंभीर असल्याची चर्चा ..

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा येथे विदर्भ स्तरीय सुरू असलेल्या आमदार चषक कबड्डी सामन्यादरम्यान आज रात्रीला जवळपास 9.30 च्या दरम्यान कबड्डी सामना रंगला असताना अचानक प्रेक्षकांची गैलरी व वरील बैनेर सह वरच्या भागात बसलेले प्रेक्षक कोसळून मोठा अपघात घडला असल्याने प्रेक्षकांची एकच तारांबळ उडाली. आनंदाच्या क्षणात जणू दुःखाचा डोंगर कोसळून चिंतेचे सावट पसरले आणि जखमींना रुग्णालयात नेण्याची धावपळ सुरू झाली. मात्र यात फार कमी प्रेक्षक गंभीर जखमी झाले नसल्याची विशेष सूत्रांकडून माहिती असली तरी एकाची प्रक्रुती चिंताजनक असल्याची चर्चा आहे. दरम्यान ही प्रेक्षकांची गैलरी कशी कोसळली याबाबत संबंधित ठेकेदार यांच्यासह पुन्हा कोण जबाबदार आहे याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू झाली असल्याची पण चर्चा आहे.

Previous articleखळबळजनक :-समोर बिबट्या आल्याने गाडीवर चे नियंत्रण सुटून भीषण अपघात.
Next articleमनसे स्टाईल :- सिमेंट रस्त्याला प्लास्टर करणाऱ्या विद्वान नगरपरिषद अभियंत्याला चोप ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here