Home वरोरा मनसे स्टाईल :- सिमेंट रस्त्याला प्लास्टर करणाऱ्या विद्वान नगरपरिषद अभियंत्याला चोप ?

मनसे स्टाईल :- सिमेंट रस्त्याला प्लास्टर करणाऱ्या विद्वान नगरपरिषद अभियंत्याला चोप ?

 

मनसेचे तालुका अध्यक्ष वैभव डहाने यांच्यावर गुन्हे दाखल. पण सुट्टीच्या दिवशी अभियंता कामावर कसे

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा नगरपरिषद चे अभियंता पुनवटकर हे शनिवारी सुटीच्या दिवशी सिमेंट रस्त्याला प्लास्टर मारण्यासाठी चक्क कामाच्या स्थळी उभे राहून काम करवून घेत होते. खरं तर जगाच्या इतिहासात सिमेंट रस्त्याला प्लास्टर करण्याची बहुदा ही पहिलीच वेळ असून मोदी है तो मुमकीन है च्या तर्जवर नगराध्यक्ष यांच्या वतीने निकृष्ट झालेल्या नवनिर्मिती सिमेंट रस्त्याला प्लास्टर करण्याचा विक्रम त्यांनी करून वरोरा शहारवाशीयांना मूर्खात काढण्याचा प्रकार चालवला असल्याने मनसे चे तालुका अध्यक्ष वैभव डहाने यांनी या कामाबाबत अभियंता पुनवटकर यांना जबाब विचारला असता त्यांच्याकडे कुठलेच उत्तर नव्हते त्यामुळे उपस्थित नागरिक जाम चिडले व अभियंता यांना सिमेंट फासले असल्याची चर्चा आहे त्यामुळे सत्तेचा दुरुपयोग करून आपला भ्रष्टाचार लपविन्यासाठी या निकृष्ट दर्जाच्या कामाचा जबाब विचरणार्या वैभव डहाने यांच्या विरोधात तक्रार देऊन शासकीय कामात अडथळा करण्याची 353 चा गुन्हा दाखल करण्यात आल्याची चर्चा पाहता सुट्टीच्या दिवशी शासकीय काम होतय की निकृष्ट दर्जाचे काम उघड होऊ नये म्हणून सारवासारव करण्यासाठी रस्त्याची डागडुजी होती? याचे उत्तर नगरपरिषद प्रशासनाकडे नाही मात्र कार्यालयीन कामाच्या वेळेस मोकाट फिरणाऱ्या व जनतेचे कामे वेळेवर न करणाऱ्या अधिकाऱ्यांना सुट्टीच्या दिवशी कशी काय शासकीय कामे करण्याची आवड निर्माण होते हे कोडेच आहे. अर्थात आपले पाप लपविन्यासाठी सुटीच्या दिवशी निकृष्ट दर्जाचे शासकीय कामे करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी तक्रार अगोदरच मनसे तालुका अध्यक्ष वैभव डहाने यांनी पोलीस स्टेशन मधे दाखल केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा कसा काय दाखल होऊ शकतो? याचे आश्चर्य वाटत आहे.
खरं पाहता वरोरा परिषद म्हणजे जणू सत्ताधारी यांना आखरी मोक्याच्या क्षणी लूट करण्याचे साधन बनले असल्याची विदारक परिस्थिती दिसत असून विरोधी बाकांवर बसलेले विरोधी नगरसेवक सुद्धा सत्ताधारी यांच्या सुरात सूर मिसळवत असल्याने सत्ताधारी यांच्या भ्रष्ट नीतीला केवळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारीच खऱ्या अर्थाने विरोधकांची भूमिका बजावत असल्याचे समोर आले आहे.दरम्यान नगरपरिषद मधे चुकीचे ठराव घेण्यासाठी एकत्र आलेले सर्व नगरसेवक नेमके जनतेच्या हिताचे काय काम करताहेत यांचा शोध जनतेला घेणे आता गरजेचे झाले आहे.

अवैध काम रोकने गुन्हा असेल तर असे गुन्हे आम्ही वारंवार करू.

शनिवारला शासकीय सुट्टी असताना न.प.इंजी.पुनवटकर त्या अवैध साइट वर काय करत होते हा प्रश्न घेऊन जर आम्ही अवैध काम रोकले तर आमच्या वर कलम 353 अन्वये गुन्हे दाखल होत असतील तर मग त्या अवैध कामे करणाऱ्या कंत्राटदारावर व त्याला अभय देणाऱ्या अभियंत्यांवर गुन्हे का दाखल होत नाही मात्र अवैध कामांना अडवने जर गुन्हा असेल तर आम्ही तो वारंवर करू अशी आक्रमक भूमिका मनसे तालुका अध्यक्ष वैभव डहाने यांनी घेतल्याने वातावरण चिघळण्याची शक्यता आहे.
Previous articleब्रेकिंग न्यूज :- आमदार चषक कबड्डी सामन्यादरम्यान प्रेक्षकांची गैलरी कोसळून कित्तेक प्रेक्षक जखमी.
Next articleकृषिवार्ता :- अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या पैसे मिळणार ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here