Home क्राईम स्टोरी क्राईम ब्लास्ट:- गोल्डमॅन सचिन शिंदे याच्या खून प्रकरणातील एका आरोपीचा खून.

क्राईम ब्लास्ट:- गोल्डमॅन सचिन शिंदे याच्या खून प्रकरणातील एका आरोपीचा खून.

 

मुलाला वाचविण्यासाठी गेलेल्या वडिलांचा पण केला खून महाराष्ट्र हादरला.

न्यूज नेटटवर्क :-

गुन्हे जगतात केव्हा काय होईल याचा नेम नसतो मग निरपराध लोकांचा पण त्या भानगडीत हकनाक जीव जातो असाच एक दुर्दैवी प्रकार पुण्यात घडला असून गोल्डमॅन सचिन शिंदे याच्या खून प्रकरणातील आरोपीचा जामीनावर सुटून आल्यानंतर ५ ते ६ जणांच्या टोळक्याने कोयता, बेसबॉलची स्टीक व दगडाने मारहाण करुन खून केला आहे. यावेळी मुलाला वाचविण्यासाठी मध्ये आलेल्या त्याच्या वडिलांनाही हल्लेखोरांनी मारहाण केली. त्यामध्ये त्यांचा देखील जागीच मृत्यू झाला.

प्रथमेश उर्फ सनी कुमार शिंदे (वय २२) आणि कुमार शिंदे (वय ५५, रा. लोणीकंद) अशी खून झालेल्या मुलाचे आणि वडिलांचे नाव आहे. ही दुहेरी खुनाची घटना बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास लोणीकंद मराठी शाळेपासून शिंदे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली.

या दुहेरी खून प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी सांगितले की, सचिन शिंदेचा गेल्यावर्षी गोळीबार करुन खून करण्यात आला होता. याप्रकरणात सनी शिंदेसह तिघांना अटक करण्यात आली होती. सुमारे ३ महिन्यांपूर्वी सनी शिंदे याला जामीन मिळाल्याने तो बाहेर आला होता. काल सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास लोणीकंद येथील शाळेच्या मागच्या बाजूला सनी व त्याचे वडील असे दोघे चारचाकी गाडीतून निघाले होते. त्यावेळी ५ ते ६ जणांनी त्याला गाठले.

Previous articleसनसनीखेज :- पत्रकार लिमेश जंगम यांची कधीही होऊ शकते हत्त्या ?
Next articleमनसे सरचिटणीस गडकरी यांच्या त्रासाला कंटाळून राज्य उपाध्यक्ष अतुल वांदिले राष्ट्रवादीत?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here